Current Affairs
हेरॉन मार्क – 2 / Heron Mark 2
- 14/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
● भारतीय हवाई दलाने देशाच्या उत्तर सीमेवर ‘हेरॉन मार्ग – 2’ हेअत्याधुनिक ड्रोन तयार केले आहेत.
● सीमेवर देखरेख ठेवण्याबरोबरच हवाई कारवाई करण्याचीही या ड्रोनची क्षमता आहे.
● या ड्रोनमुळे चीन आणि पाकिस्तान बरोबर सीमेरेषेवर गस्त घालण्याच्या भारताच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
● देशाच्या उत्तर सीमेवरील हवाई तळांवर चार नवे ‘हेरॉन मार्क – 2’ ड्रोन सज्ज ठेवण्यात आले आहेत.
● इस्राईली बनावटीच्या या ड्रोनवर दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत.
● हे ड्रोन उपग्रहांशीही संपर्क साधू शकतात. यामुळे भारतीय हवाई दलाला लांब अंतरावरूनही ड्रोनवर नियंत्रण आणि ड्रोनद्वारे सीमेवर देखरेख ठेवता येणे शक्य होणार आहे.
हेरॉन मार्क -2 ची वैशिष्ट्ये:-
● हे ड्रोन 36 तासांपर्यंत हवेत राहू शकतात.
● दीर्घ अंतरावर असलेल्या लक्ष्यावर लेझर किरणांचा मारा करून त्यांचे ठिकाण उघड करू शकतात .
● हे ठिकाण उघड होताच हवाई दलाची लढाऊ विमाने क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने लक्ष वेध करू शकतात.
● हे ड्रोन नजरेला पडणार नाहीत इतक्या उंचीवरून उडू शकत असल्याने नियंत्रण कक्षातून संपूर्ण देशावरही देखरेख ठेवता येणार आहे.
● हे ड्रोन सर्व प्रकारच्या वातावरणात काम करण्यास सक्षम असून कोणत्याही प्रकारच्या भूप्रदेशावरील लक्ष्याचा माग काढण्याची त्याची क्षमता आहे.
● स्वतंत्रपणे कारवाई करण्याचीही ‘हेरॉन मार्क -2’ ची क्षमता असून त्यासाठी त्याला क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रांनी सुसज्ज करण्याचे काम सुरू आहे.
● वजन:- 1350 किलो
● उंची गाठण्याची क्षमता :- 35 हजार फूट
● वेग :- 150 नॉट्स