महाराष्ट्र राज्य शासनाने 11 जुलै 2002 रोजी महसूल दिनाच्या आयोजना संदर्भात पहिले परिपत्रक काढले होते यानंतर दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
1 ऑगस्ट महसूल दिन हा दिवस मागे वळून आपल्या कामाचे परिक्षण करण्याचा दिवस आहे .
शासनाच्या मध्यवर्ती विभाग म्हणून महसूल विभाग कार्यरत आहे .
महसूल विभागाने वर्षभर केलेल्या विविध लोकाभिमुख कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी एक ऑगस्ट महसूल दिन म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येतो.
1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन:-
जनतेला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याकरिता 2023 यावर्षी दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.