भारतात तिहेरी तलाक विरोधात कायदा अस्तित्वात येण्याच्या वर्धापन दिनानिमित्त 1 ऑगस्ट रोजी मुस्लिम महिला हक्क दिन साजरा केला जातो .
2020 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.
पार्श्वभूमी:-
भारत सरकारने तिहेरी तलाक विरोधात 1 ऑगस्ट 2019 रोजी कायदा केला ज्याद्वारे तिहेरी तलाकच्या सामाजिक कुप्रथेस फौजदारी गुन्हा ठरविण्यात आले .
2019 पासून यात मुस्लिम पुरुषांद्वारे त्वरित घटस्फोटाची प्रथा प्रतिबंधित आहे आणि कायद्याचे कोणतेही उल्लंघन केल्यास तीन वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.