निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे नव साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
त्यामुळे 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत राज्यात साक्षरता सप्ताह राबवला जाणारा असून राज्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठीचे अध्ययन अध्यापन 8 सप्टेंबरच्या जागतिक साक्षरता दिनाच्या औचित्याने सुरू करण्यात येणार आहे.
शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने सरकारने नवसक्षरता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे .
या अभियानाच्या माध्यमातून साक्षरतेतून समृद्धीकडे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
साक्षरता दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या साक्षरता सप्ताहात प्रभाग, गाव, शाळा स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.