आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा मे दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे.
दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो.
पार्श्वभूमी:
1 मे 1886 रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी कामासाठी आठ तासांची मागणी करत मोठे आंदोलन केले होते.
14 जुलै 1889 रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे स्थापित सेकंड इंटरनॅशनल या संस्थेने सर्वप्रथम 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याचे ठरवले.
भारतातील सुरवात:
भारतात 1 मे 1923 यावर्षी पासून आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात येऊ लागला
लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानने सर्वप्रथम मद्रास येथे हा दिन साजरा केला होता