Current Affairs
11 मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
- 11/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
दरवर्षी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन (National Technology Day) साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान (Technology) क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस.
पार्श्वभूमी:
1998 साली आजच्याच दिवशी(11 मे) भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दिसून आली.
पोखरण अणुचाचणी तंत्रज्ञानातील (Technology) प्रगतीचे प्रतीक म्हणून दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ (National Technology Day) म्हणून साजरा केला जातो.
११ मे १९९८ रोजी अशी एक घटना घडली होती, ज्यामुळे जगासमोर भारताने आपली खरी ताकद दाखवली होती. त्या ऐतिहासिक घटनेची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस; साजरा करणे अधिक महत्त्वपूर्ण समजले जाते.
१९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिल्यांदा अणु चाचणी केली होती. या मोहिमेला Smiling Buddha असे नाव देण्यात आले होते.
आपल्या देशाला अण्वस्त्र संबंधितचे तंत्रज्ञान सिद्ध करण्यासाठी काही विशिष्ट चाचण्या करण्याची गरज होती. परंतु त्यावेळी आंतरराष्ट्रीय दबावामुळे आणि राजकीय कारणांमुळे अणु चाचण्या करण्यामध्ये अडचणी येत होत्या.
पुढे १९९८ मध्ये पाच यशस्वी अणु चाचण्या करुन भारताने जगाला आपली खरी ताकद दाखवून दिली.
11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-I या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली.
दोन दिवसानंतर लगेचच, पोखरण-II / ऑपरेशन शक्ती पुढाकाराचा एक भाग म्हणून यशस्वीपणे आणखी दोन आण्विक चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमुळे भारत राष्ट्रांच्या ‘न्यूक्लियर क्लब’ मध्ये सामील होणारा सहावा देश ठरला आणि नॉन-प्रोलीफरेशन ऑफ न्यूक्लियर वेपन तहामध्ये भागीदार नसलेला प्रथम देश बनला.
११ मे १९९८ मध्ये पोखरणमध्ये घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला या वर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. या गोष्टीचे निमित्त साधत देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतातील पहिल्या स्वदेशी विमानाचेही याच दिवशी (11 मे) यशस्वी उड्डाण
११ मे १९९८ रोजी पोखरण चाचणी व्यतिरिक्त आणखी काही कारणांसाठी खास होता. या दिवशी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.
त्याशिवाय भारतातील पहिले स्वदेशी विमान हंसा-3 या विमानाने पहिल्यांदा भरारी घेतली होती. वैमानिकांचे प्रशिक्षण, हवाई छायाचित्रण आणि पर्यावरणीय प्रकल्पांसाठी हे विमान वापरले जाणार होते.