Current Affairs
16 जून : जागतिक सागरी कासव दिन
- 19/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
सागरी कासवांविषयी जाणीवजागृती व्हावी यासाठी जगभरात 16 जून हा दिवस ‘जागतिक सागरी कासव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
दरवर्षी आठ टन प्लास्टिक समुद्रात कसेही फेकण्याच्या मानवाच्या निष्काळजी कृतीमुळे सागरी कासवांना सर्वात जास्त धोका निर्माण झाला आहे. या कासवांचे प्रमुख अन्न जेलिफिश हे असते. सागरी पाण्यातील वाहत आलेल्या पिशव्या आणि जेलिफिश यातील फरक त्यांना समाजत नाही. अशा प्लास्टिक पिशव्या घशात अडकून त्यांचा मृत्यू होतो.
पार्श्वभूमी:
सागरी कासवांच्या जीवशास्त्राचे जनक आणि सागरी कासव संवर्धन करणाऱ्या फ्लोरिडा येथील संस्थेचे संस्थापक डॉ. आर्ची कार यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी 16 जून हा दिवस ‘सागरी कासव दिन’ म्हणून साजरा केला जातो, तर 23 मे रोजी सर्व प्रकारच्या कासवांच्या रक्षणार्थ ‘जागतिक कासव दिन’ साजरा केला जातो.
सागरी कासवांच्या संरक्षणासाठी उपाययोजना:
16 जून या दिवशी लोकसहभागातून कासवांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी जनजागृती केली जाते.
ज्या किनाऱ्यांवर कासवे अंडी देण्यासाठी येतात ते स्वच्छ आणि सुरक्षित ठेवावेत. तिथे रात्री अंधार असू द्यावा.
अंडी घालणाऱ्या मादी कासवांना, घरटय़ाला, पिल्लांना त्रास देऊ नये.
जखमी कासव दिसल्यास वन विभागाला कळवावे. पशुवैद्यकांची मदत घ्यावी.
मच्छीमारांनी फाटलेली जाळी समुद्रात टाकू नयेत. जाळय़ात अडकलेल्या कासवांना जीवदान द्यावे.