Current Affairs
18 एप्रिल – दिनविशेष :
- 18/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या 165 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे:
महर्षी धोंडो केशव कर्वे (1858 – 1962)
जन्म : 18 एप्रिल 1858 मुरुड, शेरवली (जिल्हा : रत्नागिरी)
विवाह : राधाबाई (1873)
शैक्षणिक पार्श्वभूमी
1880 : मुंबईत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण
1884 : एल्फिन्स्टंट महाविद्यालयामधून गणित विषयात बीए ची पदवी प्राप्त
1891 ते 1914 या काळात पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक
पुनर्विवाह
1891 : पत्नी राधाबाई यांचे निधन
1893 : गोदुबाई यांच्याशी पुनर्विवाह
गोदुबाईंना आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या नावाने ओळखले जात
महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या विविध संस्था :
1893 : विधवा विवाहोत्तेजक मंडळ
1899 : अनाथ बालिकाश्रम
1907: महिला विद्यालय
1910: निष्काम कर्ममठ
1916: महिला विद्यापीठ ( 1949: SNDT – श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी)
1936 : ग्राम प्राथमिक शिक्षक मंडळ
1944 : समता संघ
महर्षी कर्वे यांना मिळालेल्या पदव्या :
1942 – बनारस विद्यापीठ (डी. लिट.)
1951- पुणे विद्यापीठ (डी. लिट
1954 – SNDT महिला विद्यापीठ (डी. लिट)
1957 या वर्षी मुंबई विद्यापीठाने महर्षी कर्वे यांना L.L .D ही पदवी दिली
पुरस्कार :
महर्षी कर्वे यांना पद्मविभूषण(1955) आणि भारतरत्न(1958) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्र :
आत्मवृत्त (मराठी -1928)
हेच 1936 या वर्षी इंग्रजी भाषेत ‘लुकिंग बॅक’ नावाने प्रकाशित
1972 यावर्षी वसंत कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली’ हे नाटक महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित आहे
निधन : 9 नोव्हेंबर 1962 ,पुणे.