Current Affairs
22 देशांशी रुपयात व्यापार |Trade in rupees with 22 countries
- 27/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
जगातील 22 देशांशी रुपया आणि संबंधित देशाचे स्थानिक चलन यामध्ये व्यापार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
रिझर्व बँकेने यासाठी विशेष रुपया ‘वास्त्रो’ खाती उघडण्यास अनुमती दिली आहे.
रिझर्व बँकेने 22 देशांतील बँका निवडून त्यांच्यासमवेत भारतात खाते उघडण्याची परवानगी 20 बँकांना 23 जुलैला दिली आहे.
आर्थिक वर्ष 2018- 19 मध्ये देशाची निर्यात 330.7 अब्ज डॉलर होती. ती 2022 -23 मध्ये वाढून 450.95 डॉलर झाल्याची माहिती देण्यात आली.
विशेष रुपया ‘वास्त्रो’ खाते:
हे खाते द्विपक्षीय पातळीवर काम करते. याचा अर्थ ज्या देशाशी रुपयात व्यापार सुरू करायचा आहे त्या देशाच्या बँकेने देशातील एका बँकेबरोबर भागीदारी करून हे खाते उघडणे अभिप्रेत आहे.
यामुळे विदेशी बँकेला व्यापारासाठी वित्तपुरवठा गुंतवणूक आणि हस्तांतर करणे या गोष्टी करणे शक्य होते.
या 22 देशांबरोबर रुपयात व्यापार:
बांगलादेश, बेलारूस, बोटसवाना ,फिजी, जर्मनी, गयाना, इजराइल, कझाकस्तान, केनिया, मलेशिया, मालदीव ,मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, ओमान, रशिया, सशेल्स, सिंगापूर, श्रीलंका, टांझानिया, युगांडा आणि ब्रिटन