● हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस (29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
● स्वातंत्र्यपूर्व काळात मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला जगात मानाचं स्थान मिळवून दिलं होतं.
● 1928, 1932 आणि 1936 अशा तीन सलग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ध्यानचंद यांच्या जादूई खेळामुळे भारतानं सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती.
● 1956 साली त्यांना सर्वोच्च अशा पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
● याच मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस आणि याच दिवशी खेळ आणि खेळांचं आपल्या जीवनातील महत्व देशातील प्रत्येक नागरिकाला पटवून देण्यासाठी 2012 सालपासून भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.