Current Affairs
29 सप्टेंबर : जागतिक हृदय दिन | 29 September : World Heart Day
- 29/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
इतिहास:
हा दिवस साजरा करण्याची सुरुवात WHF आणि WHOने केली होती. हा दिवस सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्याचं घोषित करण्यात आलं, ते 24 सप्टेंबर 2000 रोजी लाँच करण्यात आलं. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उद्देश :
जागतिक हृदय दिनाचा उद्देश हृदयाशी संबंधित आजारांबद्दल लोकांना जागरूक करणं हा आहे. आज जागतिक लोकसंख्येला प्रभावित करणाऱ्या हृदयाशी संबंधित समस्या आणि आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी WHFने या दिवसाची स्थापना केली
का साजरा केला जातो?
लोकांना जागतिक हृदय दिनाविषयी माहिती असणं खूप महत्वाचं आहे, कारण लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांबद्दल जागरूकता कमी आहे.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे सर्व वयोगटातील लोकांना हृदयाशी संबंधित आजार होतात. त्यामुळं हा दिवस लोकांना हृदयाशी संबंधित आजारांबाबत जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो.
जागतिक हृदय दिन 2023 ची थीम :
यावर्षी जागतिक हृदय दिन ‘हृदयाचा वापर करा, हृदय जाणून घ्या’ या थीमवर साजरा केला जात आहे.
आपलं हृदय स्वतः निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणं हा यामागचा उद्देश आहे.