Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > 5 जून : जागतिक पर्यावरण दिन (June 5 : World Environment Day)
5 जून : जागतिक पर्यावरण दिन (June 5 : World Environment Day)
- 05/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
- प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात 5 जुन रोजी जनतेमध्ये पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी,संपुर्ण जगाला पर्यावरणाचे महत्व पटवून देऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सर्वाना प्रेरित करण्यासाठी पर्यावरण संरक्षणाविषयी जगभरात प्रबोधन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
- 5 जून 2023 रोजी 49 वा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे.
थीम- 2023:
Solutions to Plastic Pollution’ (प्लास्टिक प्रदूषणावर उपाय)
थीम – 2022
- Only One Earth
उद्देश:
- जगातील प्रदूषणाची पातळी दररोज वाढत आहे. प्रदूषणाची वाढती पातळी निसर्गासाठी घातक आहे. हे कमी करण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
सुरवात:
- पर्यावरण दिवस साजरा करावयास सर्वप्रथम 1972 मध्ये संयुक्त राष्टाकडुन आरंभ केला गेला होता.तेव्हापासुन दरवर्षी संपूर्ण जगभरात 5 जुन रोजी पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
- 1972 मध्ये स्टॉकहोम येथे एक पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती,हीच परिषद जगातील पहिली पर्यावरण परिषद म्हणुन ओळखली जाते. ज्यामध्ये तब्बल 120 देशांनी आपला सहभाग नोंदवला होता.
भारतही पर्यावरणाबाबत गंभीर :
भारतातही 19 नोव्हेंबर 1986 रोजी पर्यावरण संरक्षण कायदा लागू करण्यात आला.
जगभरात पर्यावरण दिन कशाप्रकारे साजरा केला जातो?
- शाळा महाविद्यालयामध्ये ह्या दिवशी विविध सांस्कृतिक तसेच पर्यावरण विषयक जागृती निर्माण करत असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
- विदयार्थ्यांसाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज पर्यावरण संवर्धनाचे महत्व इत्यादी अशा पर्यावरणाचे महत्व पटवून देत असलेल्या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात.
- पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सगळयांमध्ये जागृती करण्यासाठी शाळा महाविद्यालयामध्ये रँली काढुन पर्यावरण संवर्धन विषयी घोषणा केल्या जातात.
- पर्यावरण संवर्धनाविषयी जागोजागी भिंतींवर घोषवाक्ये लिहीली जातात.पोस्टर लावले जातात.शाळा महाविद्यालयात पर्यावरणाचे महत्व विदयार्थ्यांना पटवून देण्यापुरता एखादी एकांकिका तसेच नाटक आयोजित केले जाते.
- आजुबाजुचे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी एखादी खास मोहीम राबवली जाते.
- अशा वेगवेगळया प्रकारे जागोजागी पर्यावरण दिवस साजरा केला जातो.