Current Affairs
7 एप्रिल : जागतिक आरोग्य दिन
- 07/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
थीम:
- जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम ” सर्वांसाठी आरोग्य ” (Health For All) आहे. मागील 70 वर्षांमध्ये जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य यशांकडे पुन्हा पाहण्याची संधी जगाला निर्माण करणे हा या थीमचा उद्देश आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना जगातील अनेक देशांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि आरोग्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांचे उपाय प्रभावी होण्यासाठी आरोग्यासंदर्भात आर्थिक सहाय्य देण्याचे काम करते.
- सध्या जागतिक आरोग्य संघटनेचे 194 सक्रिय सदस्य देश आहेत. या देशांमध्ये ही संस्था विविध स्तरांवर आपल्या सेवा पुरवते आणि देशांना आरोग्याबाबत जागरूक करण्याचे कामही करते.
कार्य :
- 7 एप्रिल 2023 रोजी जागतिक आरोग्य संघटना आपला 75 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या 75 वर्षांत जागतिक आरोग्य संघटनेने मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत.
- जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या सात दशकांपासून सातत्याने जगातील गंभीर आजार आणि आरोग्य संकटांचा सामना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे.
- यासह जागतिक आरोग्य संघटनेने जगाच्या विविध प्रदेशांमध्ये अन्न संकट आणि आपत्तींमध्ये वाढ करून लोकांना आणि देशांना मदत केली आहे.
- ही संस्था आर्थिकदृष्ट्या मागास किंवा अपंग देशांमध्ये मोफत रुग्णालये आणि औषधांची व्यवस्था करते.
पार्श्वभूमी :
- जागतिक आरोग्य संघटनेतर्फे 1948 साली जिनिव्हा येथे आयोजित प्रथमच जागतिक आरोग्य सभेमध्ये या दिनाची कल्पना मांडण्यात आली .
- 1950 या वर्षी जागतिक आरोग्य दिन प्रथमच जगभरात साजरा करण्यात आला
- जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेपासून, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहरात आहे.
- भारतातील त्याचे प्रादेशिक कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.
- कोविड काळातही जागतिक आरोग्य संघटनेने उत्कृष्ट काम केले आहे. यामध्ये मोफत वैद्यकीय किट प्रदान करणे आणि गरजूंना योग्य लस उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या आश्रयाने तयार करण्यात आलेली ही संघटना मानवी आरोग्यासाठी अग्रगण्य जागतिक संस्था मानली जाते.
WHO :- World Health Org
(जागतिक आरोग्य संघटना)
स्थापना : 7 एप्रिल 1948
मुख्यालय : जिनिव्हा
अध्यक्ष: टेड्रॉस अधोनम गेब्रायसेस