Current Affairs
7 ऑगस्ट : राष्ट्रीय हातमाग दिन |7th August : National Handloom Day
- 05/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो.
उद्देश :-
हातमाग उद्योगाची भरभराट करण्यासाठी हातमाग उत्पादन आणि संबंधित परंपरांचे रक्षण करणे.
राष्ट्रीय हातमाग दिन 2023 ची थीम :-
शाश्वत फॅशनसाठी हातमाग “Handlooms for Sustainable Fashion”
का साजरा केला जातो हा दिवस?
2015 पासून दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ म्हणून साजरा होऊ लागला.
देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची सुरुवात केली.
2015 या वर्षी नरेंद्र मोदी यांनी केलेले ट्विट :- “राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वांना सलाम करतो. त्यांनी आपल्या राष्ट्राच्या स्वदेशी हस्तकलांचे जतन करण्यासाठी स्तुत्य प्रयत्न केले आहेत. आपण सर्वांनी #Vocal4Handmade बनूया आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रयत्न मजबूत करूया.”
आपल्या हातमागची ओळख संपूर्ण जगात होण्यास मदत होत आहे. केवळ साजरा करण्यापुरता हा दिवस मर्यादित न राहता आज हातमागाचे कपडे हे ब्रॅण्डेड म्हणून परदेशातही पोहोचविण्यात यानिमित्ताने हातभार लागला आहे.
1905 मध्ये कलकत्ता येथे 7 ऑगस्ट रोजी स्वदेशी चळवळ सुरू झाली होती त्यामुळे 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्यासाठी निवडण्यात आला