Current Affairs
7 नोव्हेंबर : विद्यार्थी दिवस | 7th November : Students Day
- 07/11/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 7 नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय 27 ऑक्टोबर, 2017 रोजी घेतला.
अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले.
या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.
इतिहास:-
7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता.
येथे ते इ.स. 1904 पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे.
शाळेच्या रजिस्टरमध्ये 1914 क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे.
इ.स. 2003 पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत. या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी अनेकदा महाराष्ट्र शासनाला केली होती. शेवटी इ.स. 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा ठरविला.