Current Affairs
91 एफएम ट्रान्समिटर्सचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
- 28/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातूनन देशातील 100 व्हॅट क्षमतेच्या 91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन केले.
देशातील 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये हे 91 नवीन 100 W एफएम ट्रान्समीटर्स बसवण्यात आले आहेत.
आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर या रेडिओ कनेक्टिव्हिटी विस्ताराचा विशेष भर आहे.
यामुळे देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळणार आहे.
हिंगोली वाशिम आणि नंदुरबार हे जिल्हे निती आयोगाकडून आकांक्षीत जिल्हा म्हणून जाहीर केले आहेत तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा हे नक्षल प्रभावित तालुके आहेत आणि नाशिक जिल्यातील सटाणा हा तालुका आदिवासीबहुल आणि गुजरात सीमेलगत आहे.
महाराष्ट्रातील 7 एफएम ट्रान्समिटर्सचा समावेश
महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा आणि वाशिम येथील 7 एफएम ट्रान्समिटर्सचा समावेश आहे.