Current Affairs
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी होणार
- 24/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information

आगामी 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर जिल्हा जळगाव येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली
2023 या वर्षीतले 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्यामध्ये वर्धा या ठिकाणी पार पडले होते (अध्यक्ष : नरेंद्र चपळगावकर)
आगामी संमेलनाच्या स्थळ निश्चितीसाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या स्थळ निवड समितीची बैठक झाली
महामंडळाकडे या संमेलनासाठी सातारा, औदुंबर, अमळनेर आणि जालना अशा चार ठिकाणाहून निमंत्रणे प्राप्त झाली होती .
या समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणाची पाहणी केली आणि अंतिमतः अमळनेर वर शिक्कामोर्तब केले.
72 वर्षांनी साने गुरुजींच्या कर्मभूमीला पुन्हा संधी
अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी. बहिणाबाई, ना. धो. महानोर यांचा शब्दसहवासही या ठिकाणाला लाभला आहे.
1952 साली कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेरला संमेलन झाले होते