● ‘ऑपरेशन सिंदूर ‘द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील (पीओजेके) दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर 24 क्षेपणास्त्रे डागून ती उद्ध्वस्त करण्यात आली.
● यामध्ये मुख्यतः जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तय्यबा या भारताविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यात आले.
मोदींनी ठरवले ‘सिंदूर’ नाव
● पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर लष्कराने केलेल्या हल्ल्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिले.
● पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली. त्यातील सर्व पुरुष होते. यातील अनेक बळींच्या पत्नींनी त्यांच्या वेदना मांडल्याने पहलगाम हल्ल्याच्या त्या चेहरा झाल्या होत्या. त्यामुळेच ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव प्रत्युत्तरासाठी निश्चित करण्यात आले.
● भारतीय परंपरेत कुंकू (सिंदूर) सौभाग्याचे चिन्ह असून, हा शब्द विवाहित महिलांशी जोडला जातो.
● 7 मे 2025 रात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.
● जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
● पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यासाठी भारताने अचूक हल्ला करणाऱ्या शस्त्रप्रणालीचा वापर केला.
● यामध्ये स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र, हॅमर बॉम्ब आणि आत्मघाती ड्रोनचा वापर केला असून, राफेल विमाने आणि सुखोई 30 एमके आय या लढाऊ विमानांनी लक्ष्यांचा अचूक भेद केला
स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र
● स्कॅल्प क्षेपणास्त्र हवेतून डागले जाते.
● शत्रूला चकवा देऊन (स्टेल्थ) मारा करण्यासाठी हे क्षेपणास्त्र ओळखले जाते.
● सर्व प्रकारच्या वातावरणात आणि रात्रीही क्षेपणास्त्रे मारा करू शकतात.
● या क्षेपणास्त्रांच्या अशा वेगळ्या दर्जामुळे विविध देशांची संरक्षण दले त्याला पसंती देतात या क्षेपणास्त्रांचा पल्ला 300 किलोमीटर असून बंकर उध्वस्त करण्यासाठी ती वापरली जातात.
हॅमर’ बॉम्बचे वैशिष्ट्ये
● ‘हायली एजाइल मॉड्युलर म्युनिशन एक्स्टेंडेड रेंज’ (हॅमर) बॉम्ब हे हवेतून जमिनीवर अचूकतेने मारा करू शकतात.
● ग्लाइड बॉम्ब म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
● 70 किलोमीटरपर्यंत हे बॉम्ब मारा करू शकतात.
● फ्रान्सच्या सॅफ्रन कंपनीने हे बॉम्ब तयार केले आहेत.
● कमी उंचावरूनही हे बॉम्ब डागले जाऊ शकतात. या बॉम्बना टिपणे अतिशय कठीण असते आणि हे बॉम्ब लक्ष्याचा अचूक वेध घेऊन कठीण असे संरक्षक कवच भेटू शकतात.
भारतीय सैन्य दल प्रमुख
भारतीय लष्कर प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे)
हवाई दल प्रमुख : अमरप्रीत सिंग (28 वे)
नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी(26 वे)
भारताने राबविलेले काही महत्वाचे ऑपरेशन
ऑपरेशन पोलो (Operation POLO) –
●भारतीय सशस्त्र दलांनी हैदराबादच्या निजामाची राजवट संपवली आणि दक्षिण भारतातील हैदराबाद संस्थानाचा भारतीय संघराज्यात समावेश केला. हे ऑपरेशन १९४८ रोजी हैद्राबाद संस्थानात करण्यात आले होते.
ऑपरेशन ब्लू स्टार –
●पंजाबमधील अमृतसर येथील हरमंदिर साहिब मंदिर संकुल (ज्याला सुवर्ण मंदिर म्हणूनही ओळखले जाते) शीख नेते जर्नेल सिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांच्या गटाला पकडण्यासाठी भारतीय सैन्याने 1 ते 10 जून 1984दरम्यान ऑपरेशन ब्लू स्टार केले.
ऑपरेशन मेघदूत –
● लडाखमधील सियाचीन ग्लेशियरवर पूर्ण ताबा मिळविण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशनचे कोडनेम ऑपरेशन मेघदूत होते.
● 13 एप्रिल 1984 रोजी सकाळी राबवण्यात आलेले हे जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे.
● या ऑपरेशनने पाकिस्तानच्या ऑपरेशन अबाबीलला रोखले आणि ते यशस्वी झाले, परिणामी भारतीय सैन्याने संपूर्ण सियाचीन ग्लेशियरवर नियंत्रण मिळवले.
ऑपरेशन पवन –
● 1987 च्या उत्तरार्धात भारत-श्रीलंका कराराचा भाग म्हणून एलटीटीईचे निःशस्त्रीकरण करण्यासाठी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) पासून
जाफनाचा ताबा घेण्यासाठी, ज्याला तमिळ टायगर्स म्हणून ओळखले जाते, भारतीय शांती सेना (आयपीकेएफ) ने केलेल्या ऑपरेशनला ‘ऑपरेशन पवन’ हे
सांकेतिक नाव देण्यात आले होते.



