महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांच्या जागी आता डॉक्टर नितीन करीर यांची या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सैनिक हे 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाले.
अधिक माहिती
• सौनिक यांनी 30 एप्रिल ते 31 डिसेंबर या कालावधीत मुख्य सचिवपद भूषवले.
• नितीन करीर हे राज्याचे 47 वे मुख्य सचिव असतील.
• 1988 च्या बॅचचे IAS असलेले डॉ. नितीन करीर हे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
• एमबीबीएस व एमबीए असे शिक्षण असलेले डॉक्टर करीर हे मार्च 2024 अखेर सेवानिवृत्त होतील.
• पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळही पूर्ण झाल्याने ते देखील निवृत्त होत आहेत. त्यामुळे महासंचालकपदाचा तात्पुरता कारभार विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


