आशियाई फिल्म फाउंडेशन तर्फ दरवर्षीप्रमाणे यावर्षी 12 ते 18 जानेवारी दरम्यान थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या महोत्सवाचे 20 वे वर्षे आहे.
अधिक माहिती
● या महोत्सवात निवडलेले चित्रपट मुंबईतील माहीम परिसराततील सिटीलाईट सिनेमा आणि कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात दाखवण्यात येणार आहेत .
● ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात आशियाई विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका या देशातील बारा चित्रपट तसेच इराणमधील सात चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
● भारतीय चित्रपट विभागात मराठीसह मल्याळम, कन्नड ,तेलुगु बंगाली ,आसामी भाषांमधील बारा चित्रपटांचा समावेश आहे.


