दुसऱ्या मानांकित बेलरूसच्या अरिना सबालेन्काने एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत चीनच्या क्वीनवेन झेंगचा सरळ सेटमध्ये पराभव करताना सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत सबालेन्काने 6-3, 6-2 असा सहज विजय मिळवला. 25 वर्षीय सबालेन्काचे हे ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील सलग दुसरे विजेतेपद ठरले. गेल्या वर्षी (2023) एलिना रायबाकीनाला पराभूत करत कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले होते. दशकभरात ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी सबालेन्काने ही दुसरी महिला टेनिसपटू ठरली. यापूर्वी व्हिक्टोरिया अझारेंका 2012 आणि 2013 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. या दोन्ही खेळाडू बेलारूसच्या आहेत.
सबालेन्काने कारकिर्दीतील चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले
● महिला एकेरीत तिने दोन वेळा (2023 आणि 2024) ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली याशिवाय 2021 यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2019 यावर्षी अमेरिकन ओपन मध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.


