राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने नुकतीच भारतातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर केली. यामध्ये कोलकत्ता शहर सलग तिसऱ्यांदा सुरक्षित शहर ठरले तर देशाची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी पुणे सुरक्षा बाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे .
● ‘भारतातील गुन्हेगारी 2022’ या शीर्षकाच्या अहवाल 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे.
● अहवालानुसार महानगरामध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे दखलपात्र गुन्ह्यांची सर्वात कमी नोंद कोलकत्यात झाली आहे.
● कोलकत्यात प्रति लाख लोकसंख्येत दखलपात्र गुन्हे 86.7 नोंदविण्यात आले आहेत.
● पुण्यात हे प्रमाण 280.7 तर हैदराबाद मध्ये 299.2 असे आहे.
● भारतीय दंड संहिता विशेष आणि स्थानिक कायदे याअंतर्गत नोंदविले जाणारे गुन्हे हे दखलपात्र समजले जातात.


