अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे ‘युनेस्को’ च्या सहकार्याने बँकॉक येथे 12 व्या कल्चरल ऑलम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे आयोजन केले होते. ऑलम्पियाडमध्ये 300 हून अधिक कलाकारांनी भाग घेतला होता.
● पुण्याच्या अन्वेसा सिंग यांनी भारतीय शास्त्रीय नृत्यात कांस्यपदक पटकावले.
● कोलकत्ताच्या कथक नृत्यांगना पांचाली मुखर्जी यांच्याकडून कथक नृत्याचे धडे घेतलेल्या अन्वेसा यांना अखिल भारतीय सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष हेमंत वाघ आणि रत्ना वाघ यांचे मार्गदर्शन मिळाले.
● नृत्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय अभिमान पुरस्कार ,नृत्य विभूषण पुरस्कार, श्री हरी नृत्यरत्न सन्मान इत्यादी पुरस्काराने सन्मानित केले आहे.


