भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा ‘पद्मपाणी’ जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना जाहीर झाला. 9 व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
• जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोचवणाऱ्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा झाली.
• नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित हा महोत्सव महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने 3 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.


