पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या किसान महिलासाठी पीएम ड्रोन दीदी योजना सुरु केली आहे. भारतीय महिलांचा शेतीमधील सहभाग सतत वेगाने वाढत आहे. यामुळे महिलांना सक्षम बनण्याची संधी तर मिळत आहेच, याशिवाय त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही सुधारत आहे. महिलांचा शेतीतील सहभाग वाढावा यासाठी सरकार विविध योजनाही सुरू करत आहे. याच क्रमाने आता केंद्र सरकारने ड्रोन दीदी नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे कृषी महिलांचे उत्पन्न वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
योजनेचा उद्देश
● पीएम ड्रोन दीदी योजनेचा उद्देश महिलांना त्यांच्या स्थानिक कृषी पुरवठा साखळी आणि ग्रामीण समृद्धीचा अविभाज्य भागधारक बनण्यास मदत करणे हा आहे.


