Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अर्थसंकल्प 2024-25

  • रोजगार निर्मितीसाठी गुंतवणुकीला प्राधान्य व प्रोत्साहन योजना, ग्रामीण असंतोष दूर करण्यासाठी लघु उद्योगांना चालना तसेच मध्यम वर्गाला दिलासा देणारी कर सवलत अशा विविध तरतुदी करून 2024 – 25 साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडला.
  • लोकसभेतील सुमारे दीड तासांच्या भाषणांमध्ये सितारामन  यांनी उत्पादनवाढ, रोजगारवाढ, कृषी, सामाजिक न्याय, नागरी विकास, ऊर्जासुरक्षा, पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा इत्यादींना प्राधान्य देणारा अर्थसंकल्प सादर केला .
  • हा त्यांचा सातवा अर्थसंकल्प आहे .
  • यापूर्वी मोरारजी देसाई यांनी सहा अर्थसंकल्प मांडले होते.

 

 ठळक वैशिष्ट्ये:

प्रमुख क्षेत्रांसाठी तरतुदी:

1) सरंक्षण – 4,54,773 कोटी

2) ग्रामीण विकास – 2,65,808 कोटी

3) कृषी – 1,51,851 कोटी

4) गृह – 1,50,983 कोटी

5) शिक्षण – 1,25,638 कोटी

6) आयटी, दूरसंचार – 1,16, 342 कोटी

7) आरोग्य – 89,287 कोटी

8) ऊर्जा – 68, 769 कोटी

9) सामाजिक कल्याण – 56, 501 कोटी

10) उद्योग – 47, 559 कोटी

 

 विकसित भारतासाठी नऊ प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे:

1) कृषी उत्पादकता

  • शेतकऱ्यांना देय रक्कम मिळण्यासाठी शेतजमीन आणि शेतकरी यांची डिजिटल नोंदणी
  • गरीब कल्याण अन्न योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ
  • उच्च उत्पादन क्षमता असलेले आणि सर्व वातावरणात टिकून राहणारी 109 प्रकारच्या फळबिया पुरविणार.
  • उच्च गुणवत्ता असलेल्या बियाणांची निर्मिती करण्यासाठी खासगी क्षेत्राला निधी पुरविणार
  • कृषी आणि पूरक क्षेत्रासाठी52 लाख कोटी रुपये
  • डाळी आणि तेलबियांचे उत्पादन वाढवून

स्वयंपूर्ण होणार

  • भाजीपाला पुरवठा साखळी विकसित करणार
  • एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार
  • एक हजार बायो-इनपुट रिसोर्स केंद्र स्थापन करणार

2) रोजगार व कौशल्यविकास

  • रोजगार व कौशल्यविकासासाठी पंतप्रधानांच्या पाच योजना. पुढील पाच वर्षांत1 कोटी युवकांना संधी. 2 लाख कोटी रुपयांची तरतूद
  • तीन रोजगार योजना राबविणार. नोकरीस सुरुवात करणाऱ्या तीस लाख युवकांना एक महिन्याचा पीएफ देणार.
  • शिक्षण क्षेत्रासाठी48 लाख कोटी रुपये एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाऊचरद्वारे तीन टक्के व्याजदराने कर्ज; उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज देणार
  • कौशल्य विकासासाठीच्या आदर्श कर्ज योजनेअंतर्गत आता5 लाखापर्यंत कर्ज
  • राज्यांच्या सहकार्याने नव्या कौशल्य योजना; पुढील पाच वर्षांत 20 लाख युवकांना प्रशिक्षण देणार
  • नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे उभारणार

3) सर्वसमावेश विकास

  • बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या व्यापक विकासासाठी ‘पूर्वोदय’ योजना तयार करणार
  • नालंदा विद्यापीठाला गतवैभव प्राप्त करून देणार, पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार
  • अमृतसर-कोलकता औद्योगिक कॉरिडॉरवर गया येथे उद्योग केंद्र उभारणार
  • महिला आणि मुलींना उपयुक्त असणाऱ्या योजनांसाठी तीन लाख कोटी रुपये
  • आदिवासी समुदायांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियान राबविणार
  • ईशान्य भारतात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शंभर शाखा उघडणार

4) उत्पादन आणि सेवा

  • यंत्रे आणि उपकरणे खरेदीसाठी सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांना मुदत कर्ज घेताना ‘थर्ड पार्टी’ची गरज नाही
  • आर्थिक अडचणीच्या काळातही कर्ज मिळणार
  • पूर्वी मुद्रा कर्ज घेऊन ते फेडलेल्यांसाठी कर्जमर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रु.
  • ई कॉमर्स निर्यात केंद्र उभारणार

5) नगरविकास

  • हस्तांतरावर आधारित विकास : तीसलाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 14 मोठ्या शहरामध्ये हस्तांतरावर आधारित विकास करणार
  • मुद्रांक शुल्क : महिलांनी मालमत्ता खरेदी करावी यासाठी मुद्रांक शुल्कात घट करण्यास राज्यांना प्रोत्साहन
  • रस्ते बाजार : निवडक शहरांमध्ये शंभर आठवडी बाजार सुरू करण्यासाठी योजना
  • जल व्यवस्थापन : शंभर शहरांमध्ये जल व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि सेवा राबविणार. या प्रकल्पांसाठी बँकांद्वारे
  • कर्जपुरवठा शक्य घरकुल योजना : शहरी भागातील एक कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना पीएम आवास योजनेचा लाभ देणार

6) ऊर्जा सुरक्षा

  • ऊर्जा प्रकल्पांसाठी 21,400 कोटी रुपयांची तरतूद
  • रोजगार, वाढ आणि पर्यावरणाच्या शाश्वत स्थितीसाठी ‘ऊर्जा हस्तांतर मार्ग’ धोरण राबविणार
  • ऊर्जा साठवणूक प्रकल्पांना प्रोत्साहन देणार
  • छोट्या आणि मध्यम आकाराच्या अणुभट्ट्यांचा विकास करणार
  • औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी नवे करार करणार
  • इमारतींच्या छतांवर सौर पॅनेल बसविणाऱ्यांसाठी योजना. एक कोटी घरांना महिन्याला तीनशे युनिटपर्यंतची वीज मोफत मिळू शकणार

7) पायाभूत सुविधा

  • भांडवली खर्चासाठी सरकारकडून 11,11,111 कोटी रुपयांचा निधी
  • पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांना5 लाख कोटींचे दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज देणार
  • ग्रामीण रस्ते योजनेचा चौथा टप्पा राबविणार
  • बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम या पूरग्रस्त राज्यांना निधी पुरविणार
  • विष्णुपाद मंदिर कॉरिडॉर आणि महाबोधी मंदिर कॉरिडॉरचा विकास करणार
  • मंदिरे, स्मारके, अभयारण्ये, समुद्रकिनारे यांच्या विकासासाठी मदत करणार

8) संशोधन आणि विकास

  • मूलभूत संशोधनासाठी ‘अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी’ स्थापन करणार
  • खासगी क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी एक लाख कोटींची तरतूद
  • अवकाश संशोधनाला आणि उद्योगाला बळ देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी

9) ‘नेक्स्ट जनरेशन’ सुधारणा

  • ग्रामीण भागातील सर्व जमिनींना ‘युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर’ देणार
  • जमिनींच्या नोंदी स्थानिक पातळीवर होणार
  • ई श्रम पोर्टल इतर पोर्टलशी जोडणार, जेणेकरून नोकरी शोधणाऱ्यांसाठी आणि देणाऱ्यांसाठी सोयीचे जाणार आहे
  • उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील तक्रारींचे निवारण वेगाने करण्यासाठी श्रम सुविधा आणि समाधान पोर्टलमध्ये बदल करणार
  • जमीन व्यवस्थापन, नगर नियोजन यामधील नियमांमध्ये सुधारणा करणार

 इतर प्रमुख वैशिष्ट्ये:

  • स्टार्टअप इकोसिस्टीम विकसित करणार
  • परकी कंपन्यावरील कंपनी कर 40% वरून 35 टक्क्यांवर
  • देशांतर्गत वाहतूक करणाऱ्या परकी जहाज कंपन्यांना सवलती
  • 100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क उभारणार
  • अर्थव्यवस्थेच्या डिजिटायझेशनसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविणार
  • उद्योगस्नेही वातावरण निर्मितीसाठी जनविश्वास विधेयक0 आणणार
  • व्यापार सुधारणा कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहन
  • मोबाईल फोन ,चार्जर ,हँडसेट निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांसाठी आयात शुल्क घटवून 15 टक्क्यांवर
  • 1000 आयटीना अद्यावत करणार
  • ग्राम विकासासाठी66 लाख कोटींची तरतूद
  • ज्येष्ठ कलाकारांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न 72 हजारांपेक्षा कमी आहे त्यांना आर्थिक मदत
  • दुरुस्तीसाठी आयात केलेल्या मालाची निर्यात करण्यासाठीची काल मर्यादा सहा महिन्यांवरून एक वर्षापर्यंत वाढविली
  • याच अंतर्गत तीन ते पाच वर्ष वॉरंटी असलेल्या वस्तूंची दुरुस्तीसाठी फेर आयात करण्याचीही कालमर्यादा वाढवली
  • देखभाल आणि दुरुस्ती उद्योगाला बळ
  • कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा देताना आणखी तीन प्रकारच्या औषधांवरील सीमाशुल्क माफ
  • मोबाई,ल मोबाईल पीसीबीए व चार्जर यांच्यावरील सीमा शुल्क 15 टाक्यांवर
  • 25 दुर्मिळ खनिजांच्या आयातीवरील सीमा शुल्क रद्द
  • सौर घट आणि बॅटरी निर्मितीसाठी सवलत असणाऱ्या वस्तूंच्या यादीचा विस्तार

 

 महाराष्ट्रासाठी 7,545 कोटी:

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला 7,545 कोटींच्या वर निधी आला.
  • विदर्भ व मराठवाड्यातील सिंचना बरोबरच मुंबई, पुणे व नागपूर या शहरांच्या मेट्रोसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

 

1) विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प :  600 कोटी

2) महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार : 400 कोटी

3) सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनोमिक कॉरिडॉर : 466 कोटी

4) पर्यावरण पूरक शाश्वत कृषी प्रकल्प : 598 कोटी

5) महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : 150 कोटी

6) मुंबई मेट्रो :1087 कोटी

7) दिल्ली – मुंबई औद्योगिक कॉरिडॉर :499 कोटी

8) ग्रीन अर्बन मोबिलिटी :150 कोटी

9) नागपूर मेट्रो : 683 कोटी

10) नाग नदी पुनर्जीवन : 500 कोटी

11) पुणे मेट्रो : 814 कोटी

12) मुळा मुठा नदी संवर्धन : 690 कोटी

 

नवीन कर प्रणाली (आर्थिक वर्ष: 2024-25)

उत्पन्न रुपये                        कर%

1) 0 ते 3,00,000                  0

2) 3 लाख ते 7 लाख               5

3) 7 लाख ते 10 लाख            10

4) 10 लाख  ते 12 लाख         15

5) 12 लाख ते 15 लाख          20

6) 15 लाखापेक्षा अधिक          30

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *