ऑस्ट्राहिंद संयुक्त लष्करी सराव 2024
- ऑस्ट्राहिंद या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या संयुक्त लष्करी सरावाला पुण्यामध्ये फॉरिन ट्रेनिंग नोड येथे सुरुवात झाली.
- 8 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2024 दरम्यान हा सराव होणार आहे.
- ऑस्ट्राहिंद हा वार्षिक युद्धसराव असून तो भारत आणि ऑस्ट्रेलियात आलटून पालटून आयोजित केला जातो.
- यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये हा युद्धसराव ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आला होता.
- भारतीय तुकडीमध्ये 140 लष्करी कर्मचारी असून त्यामध्ये प्रामुख्याने डोग्रा रेजिमेंटच्या जवानांचा आणि भारतीय हवाई दलाच्या 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- ऑस्ट्रेलियन लष्करी तुकडीमध्ये 120 कर्मचारी असून त्यामध्ये सेंकड डिव्हीजनच्या 10 ब्रिगेडच्या 13व्या लाईट हॉर्स रेजिमेंटचा समावेश आहे.
- ऑस्ट्राहिंद हा युद्धसराव संयुक्त राष्ट्रांच्या आदेशाच्या सातव्या अध्यायात नमूद केल्यानुसार अर्धशहरी आणि अर्ध-वाळवंटी प्रदेशात संयुक्त पारंपरिक मोहिमांमध्ये आंतरपरिचालनक्षमतेत वाढ करून या माध्यमातून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लष्करी सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित केला जातो.
- हा युद्धसराव युद्ध तयारी आणि सामरिक प्रशिक्षण टप्पा आणि सत्यापन टप्पा अशा दोन टप्प्यात आयोजित केला जाईल.
- या युद्धसरावात आयोजित होणाऱ्या ड्रिल्स/ ऍस्पेक्ट्समध्ये दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या एखाद्या प्रदेशाच्या मुक्ततेची मोहीम, संयुक्त परिचालन केंद्राची स्थापना, छापे आणि शोध आणि उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमांसारख्या संयुक्त दहशतवादविरोधी मोहिमांचे आयोजन, हेलिपॅडचे संरक्षण, ड्रोन्सचा वापर आणि ड्रोन प्रतिबंधक उपाययोजना आणि विशेष हेलिबोर्न कारवायांचा समावेश आहे.
- ऑस्ट्राहिंद हा युद्धसराव दोन्ही बाजूंना युद्धाच्या डावपेचांमधील सर्वोत्तम पद्धती, डावपेचांची आखणी करुन राबवल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचा वापर यांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो.
- दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये यामुळे सौहार्द आणि परस्परांविषयी सन्मान निर्माण होईल.
दक्षता जागरुकता सप्ताह 2024
- दक्षता जागरुकता सप्ताह हा भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात केंद्रीय दक्षता आयोगाच्या सहभागी दक्षता उपक्रमांपैकी एक आहे.
- ही एक जागरूकता निर्माण करणे आणि पोहोचण्याचा उपाय आहे ज्याचा उद्देश सर्व भागधारकांना एकत्र आणणे आहे.
- शासन आणि सार्वजनिक प्रशासनात नैतिकता आणि पारदर्शकतेच्या गरजेबद्दल अधिक संवेदनशीलता निर्माण झाल्याचे दिसून येते.
- आयोग सर्व नागरिकांच्या सक्रिय पाठिंब्याने आणि सहभागाने अखंडतेला चालना देण्यासाठी आणि भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न करतो.
- मागील तीन वर्षापासून, एका आठवड्यापर्यंत एक मोहीम राबविण्यात येत आहे ज्यात प्रतिबंधात्मक दक्षता उपक्रम फोकस क्षेत्रे आहेत.
- दरवर्षी ज्या आठवड्यात भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस येतो त्या आठवड्यात दक्षता जनजागृती सप्ताह पाळला जातो.
- जनजागृती सप्ताह 2024 खालील थीमवर 28 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत साजरा करण्यात आला.
- “सत्यनिष्ठा की संस्कृती से राष्ट्राची समृद्धी” “राष्ट्राच्या समृद्धीसाठी अखंडतेची संस्कृती”
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्यांक दर्जा कायम
- अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) अल्पसंख्याक दर्जाविषयीचे प्रकरण नियमित खंडपीठाकडे पाठविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आला आहे.
- यासोबतच विद्यापीठाची स्थापना केंद्रीय कायद्यानुसार न झाल्याने हे विद्यापीठ अल्पसंख्याक संस्था मान्य करता येत नाही, हा 1967 चा निर्णयदेखील सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.
- सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी 4:3 या बहुमताच्या निर्णयात अल्पसंख्यक दर्जाविषयीचे मुद्दे विचारार्थ मांडताना मापदंडही निश्चित केले.
- यावेळी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठातील न्या. संजीव खन्ना, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांनी एकमताने तर न्या. सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्ता यांनी मतभिन्नता दर्शविली.
- 1967 मध्ये पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने एस अझीझ बाशा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्यात एएमयू हे केंद्रीय विद्यापीठ आहे. आणि त्यामुळे ती अल्पसंख्याक संस्था मानली जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला होता.