राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले असून अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य करत अहमदनगरचे नाव बदलले आहे.
अधिक माहिती
• अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचेही नाव बदलण्यात आले असून आता या तालुक्याला ‘राजगड’ असे नाव देण्यात आले आहे.
• नामांतराचा हा प्रस्ताव आता पुढील मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला जाणार आहे.
• केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार गाव व शहरांचे नाव बदलण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे आहेत.
• कोणत्याही विभागीय आयुक्त कार्यालयाकडून गाव किंवा शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आल्यास केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर शासनामार्फत नामांतराची अधिसूचना करण्यात येते.
अलीकडेच काही महत्वाच्या ठिकाणांची बदललेली नावे
• अहमदनगर – अहिल्यानगर
• वेल्हे – राजगड
• औरंगाबाद – छत्रपती संभाजीनगर
• उस्मानाबाद जिल्हा – धाराशिव
• अलाहाबाद – प्रयागराज
• राजपथाचे – कर्तव्यपथ
• फैजाबाद – अयोध्या
• गुरगाव – गुरूग्राम