Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आंध्र प्रदेशला पोर्तुगालचा गुलबेनकियान पुरस्कार जाहीर

आंध्र प्रदेशला पोर्तुगालचा गुलबेनकियान पुरस्कार जाहीर

जन सुराज्य पक्षाची ‘स्थापना

  • राजकीयरणनीतीकार प्रशांत किशोर यांनी  ‘जन सुराज्य पक्षाची स्थापना केली.
  • हापक्ष आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
  • परराष्ट्रसेवेतील माजी अधिकारी मनोज भारती यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • दोनवर्षांपूर्वी प्रशांत किशोर यांनी चंपारण येथून 3000 किमी पदयात्रा काढली होती.
  • बिहारच्याजनतेला दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच रोजगार संधीसाठी या नव्या पक्षाची स्थापना प्रशांत किशोर यांनी केली.

आंध्र प्रदेशला पोर्तुगालचा गुलबेनकियान पुरस्कार जाहीर

  • आंध्रप्रदेशच्या कम्युनिटी मॅनेज्ड नॅचरल फार्मिंग  उपक्रमाला ‘2024 या वर्षाचा मानवतेसाठीचा प्रतिष्ठित गुलबेनकियान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
  • हापुरस्कार पर्यावरणपूरक शेतीतील केलेल्या महत्वपूर्ण प्रयत्नांसाठी आंध्र प्रदेश राज्याला जागतिक पटलावर महत्व प्राप्त करून देतो.
  • गुलबेनकियानपुरस्कार पोर्तुगालमधील कॅलोस्ट गुलबेनकियान फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी हा  प्रदान करण्यात येतो.
  • नवनवीनपद्धतींचा अवलंब करीत कृषी क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत प्रत्येकासाठी मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध करून देणे आणि जगाला हवामान बदलास अधिक प्रतिरोधक बनविण्यासाठी केलेल्या  प्रयत्नांची दखल घेऊन गुलबेनकियान पुरस्कार प्रदान केला जातो.

ख्रितोफर बेनिंजर यांचे निधन

  • आंतरराष्ट्रीयकीर्तीचे वास्तुविशारद व शहर नियोजनकार प्रा. ख्रिस्तोफर बेनिंजर  यांचे वयाच्या 82 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
  • पुण्यातीलहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी 23 मेट्रो स्थानकांची रचना करण्यासाठी ते योगदान देत होते.
  • पुण्यातत्यांनी ‘ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिंजर आर्किटेक्ट्स’ची स्थापना केली होती.
  • अमेरिकेतजन्मलेले बेनिंजर यांनी हार्वर्ड विद्यापीठातून वास्तुविशारद  विषयाचे पदव्युत्तर आणि एमआयटी विद्यापीठातून शहर नियोजनात  पदव्युत्तर शिक्षण घेतले.
  • त्यांनी1968 पासून अहमदाबाद येथील  सीईपीटी (सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल पप्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी) विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले.
  • 1971 मध्येस्कूल ऑफ प्लॅनिंगची स्थापना करण्यासाठी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाइनमधून प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला.
  • त्यानंतर1976 मध्ये पुण्यात सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड अॅक्टिव्हिटीजची स्थापना केली.
  • देशातीलप्रतिष्ठित ग्रेट मास्टर आर्किटेक्ट पुरस्कार; तसेच सहा वेळा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे.
  • त्यांनीआयआयटी हैदराबादसह वीसहून अधिक विद्यापीठांचे कॅम्पस व इमारतींची रचना केली आहे.
  • विविधगृहनिर्माण प्रकल्पांमध्ये त्यांचे योगदान जागतिक स्तरावर नावाजले गेले.
  • भूतानचेसर्वोच्च न्यायालय आणि राजधानी थिंपूमधील मंत्रालयाच्या अनेक इमारतींची रचना केली.
  • त्यांचे’लेटर्स टू अ यंग आर्किटेक्ट’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे, याशिवाय त्यांनी विविध शोध निबंधही लिहिले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *