ओडिशाच्या चांदीपूर सागर किनारी भागात असलेल्या एकात्मिक चाचणी तळावरून नव्या अद्यायावत आकाश-एनजी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.
भारतीय संरक्षण संशोधनाने विकास संस्थेने अत्यंत कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष्य टिपण्यासाठी ही चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने चाचणीदरम्यान लक्ष्य यशस्वीरित्या रोखले आणि नष्ट केले.
अधिक माहिती
● स्वदेशी बनावटीचे रेडिओ फ्रिक्वेन्सी सिकर, लॉन्चर, मल्टी -फंक्शन रडार आणि कमांड, कंट्रोल आणि कम्युनिकेशन सिस्टीमसह क्षेपणास्त्र असलेली संपूर्ण शस्त्र प्रणाली कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले.
● चांदीपूर,आयटीआर मधील रडार, ‘टेलिमेट्री’ आणि ‘इलेक्ट्रो- ऑप्टिकल’ ट्रेकिंग सिस्टीम द्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार या प्रणालीची कार्यक्षमता अचूक आहे .
● डीआरडीओ, हवाई दल भारत डायनामिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चाचणीचे पर्यवेक्षण केले.
● आकाश- एनजी प्रणाली ही एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून अति वेगवान हवाई लक्ष्यांना रोखण्यासाठी सक्षम आहे.
● या यशस्वी चाचणीमुळे आता शस्त्र प्रणालीच्या वापरासाठी चाचण्या घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
● आकाश-एनजी चा पल्ला 80 किलोमीटर इतका आहे.