धरणात बुडणाऱ्या दोघांना वाचवताना प्राण गमावलेल्या धडगाव येथील 13 वर्षांच्या आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नंदुरबार धडगाव तालुक्यातील रोषमाळ बुद्रुक हे आदित्यचे गाव. गेल्या वर्षी शाळेच्या सुट्टीत आदित्य मामाच्या गावी, शहादा तालुक्यातील पिप्राणी येथे गेला होता. 19 मे 2023 रोजी आदित्य मामाच्या मुलांसह दरा धरणावर गेला होता. त्याच्या मामाची दोन मुले धरणात उतरली आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागली. अशा वेळी अवघ्या 13 वर्षांच्या आदित्यने जिवाची पर्वा न करता धरणात उडी घेतली दोन्ही मुलांना वाचवले, परंतु त्याने स्वतःचा प्राण गमावला.
अधिक माहिती
● राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी देशातून 18 जिल्ह्यातील 19 मुलांची निवड करण्यात आली आहे.
● राष्ट्रीय शौर्य पुरस्कार भारतातील 16 वर्षाखालील सुमारे 25 शूर बालकांना दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारीला दिला जातो.
● कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते.
● पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
● पुरस्कारप्राप्त मुले प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात सजवलेल्या हत्तीवरून सहभागी होता.