Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आसामचे ‘मोइदम्स’ युनेस्कोच्या वारसा यादीत

  • आसाममधील अहोम राजघराण्याची 600 वर्षे जुनी दफन पद्धत असलेल्या ‘मोइदम्स’ चा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आले.
  • ईशान्य भारतातील युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणारा हा पहिलाच सांस्कृतिक वारसा ठरला आहे.
  • दफन भूमी म्हणून वापरल्या जाणाऱ्या पिरॅमिड सारखी रचना असलेले हे ढिगारे ‘मोइदम्स’ म्हणून ओळखले जातात.
  • त्याचा वापर आसाममधील ताय-अहोम राजघराणे करत होते.
  • ज्या राजघराण्याने इ.स 1228 ते 1826 या दरम्यान सुमारे 600 वर्षे आसामवर राज्य केले.
  • चरैदेव मोईदान अधिकृतपणे युनेस्कोच्या वारसा यादीत आहे.
  • चरैदेव ही अहोम राज्याची राजधानी होती.
  • मोईदम ही ईशान्येकडील पहिली सांस्कृतिक संपत्ती आहे. त्याला प्रतिष्ठा मिळाली आहे.
  • भारतामध्ये सुरू असलेल्या जागतिक वारसा समितीच्या 46 व्या अधिवेशनात ‘मोइदम्स’ चा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • ‘मोइदम्स’ किंवा चरैदेवमधील अहोम राजघराण्यातील दफन पद्धतीला एप्रिल 2014 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीत पहिल्यांदा – सूचीबद्ध करण्यात आले होते.
  • 2019-20 मध्ये राज्य सरकारने – चरैदेव पुरातत्व स्थळाच्या संरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

‘मोइदम्स’ काय आहे?

  • ‘मोइदम्स’ हे आसाममध्ये 600 वर्षे राज्य करणाऱ्या ताय अहोम राजघराण्याच्या उत्तरार्ध मध्ययुगीन (13 वे-19वे शतक) काळात ढिगाऱ्यावर दफन करण्याची परंपरा आहे.
  • ‘मोइदम्स’ मध्ये प्रिय वस्तूंसह त्यांचे दफन करण्यात येत असे.
  • अहोमची पहिली राजधानी चराईदेवमध्ये ‘मोइदम्स’आढळतात.
  • यात प्रामुख्याने तीन विभाग असून पहिल्या दुमजली विभागात प्रवेशासाठी कमानीचा रस्ता असतो.
  • या विभागाला झाकणाऱ्या अर्धगोलाकार असलेल्या मातीच्या टेकडीवर विटा व मातींची संरचना आहे.
  • ‘मोइदम्स’ चा पायाची भिंत बहुभुजाकृती असून पश्चिमेला कमानीचे मजबूत प्रवेशद्वार आहे.
  • प्रत्येक कक्षात मध्यवर्ती ठिकाणी मृतदेह ठेवण्यासाठी जागा आहे.
  • राजघराण्यातील मृत व्यक्तीबरोबर त्याने वापरलेले सोन्याचे दागिने, हस्तिदंत, कपडे, शस्त्रे आदींचेही दफन केले जात असे.
  • ‘मोइदम्स’ चा आकार छोट्या टेकडीपासून मोठ्या पहाडापर्यंत आहे. ही टेकडी वनस्पतींनी झाकलेली असते.
  • हे ऐकून भारताचे 43 वे वारसा स्थळ ठरले आहे.
  • याआधी2023 मध्ये 41 वे कोलकत्ता येथील ‘शांतीनेकतेन’ तर 42 वे कर्नाटकातील ‘होयसळ मंदिर’ हे जागतिक वारसा स्थळ म्हणून युनोस्कोने घोषित केले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *