भारतीय अवकाश संशोधन संस्था आता अमेरिकेतील उद्योगपती एलोन मस्क यांच्या स्पेसेक्स या खासगी संस्थेच्या मदतीने प्रथमच जीसॅट 20 (नवे नाव जीसॅट एन 2) या पुढील पीढितील मोठा दूरसंचार उपग्रह अवकाशात सोडणार आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही इस्रोची व्यावसायिक शाखा स्पेसेक्स च्या ‘फाल्कन-9’ प्रक्षेपकाद्वारे यावर्षीच्या दुसऱ्या तीमाहित म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान जीसॅट20 चे प्रक्षेपण फ्लोरीडातून करणार आहे.
अधिक माहिती
● उच्च क्षमतेचा हा दूरसंचार उपग्रह पूर्णपणे स्वदेशी आहे. त्याची निर्मिती व त्यासाठी निधी आणि कार्यचलन एनएसआयएल ने केले आहे .
● मोठे उपग्रह सोडण्यासाठी भारताला आतापर्यंत फ्रान्सच्या एरियनस्पेस या समूहावर अवलंबून राहावे लागत होते.
● स्पेसएक्सच्या रूपाने भारताला आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
स्पेस एक्सच्या प्रक्षेपकाचा वापर कशासाठी?
● इस्रो प्रेक्षेपित करणार असलेला उपग्रह जी सॅट 20 चे वजन 4700 किलोग्रॅम आहे .
● सध्या भारताकडे उपलब्ध असलेल्या सर्वात महाकाय प्रक्षेपक एव्हीएम 3
● या प्रक्षेपकाची क्षमता 4000 टन भार वाहून येण्याची आहे.
● जीसॅट20 त्याहून अधिक वजनदार आहे.
जीसॅट 20 चे काम काय?
● हा उपग्रह किफायतशीर खर्चातील का- का बँड हाय थ्रूपूट उपग्रह आहे.
● प्रामुख्याने ब्रॉडबँड सेवा पुरवठादार आणि मोबाईल कंपन्यांना त्याची आवश्यकता आहे.
● या उपग्रहाद्वारे 32 बीमची एचटीएस क्षमता अंदमान- निकोबार आणि लक्षद्वीप बेटांसह सर्व देशभरात उपलब्ध होणार.
● दुर्गम भाग आणि सध्या सेवा न पोहोचलेल्या भागात गरजा लक्षात घेऊन उपग्रहाची रचना.
● या उपग्रहाद्वारे 48 जीबीपीएस (गिगा बाईट पर सेकंद)वेग मिळणे शक्य होणार.


