● अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू प्रभावीपणे मांडलेले वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
● मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकविण्यात निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.
● राष्ट्रपतींनी माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार मीनाक्षी जैन आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन यांचीही राज्यसभेवर नियुक्ती केली आहे.
● कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा तसेच अन्य क्षेत्रांत कार्यरत असलेल्या बारा व्यक्तींना राज्यसभेवर नियुक्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
● या अधिकाराअंतर्गत राष्ट्रपतींनी या चौघांची संसदेच्या वरिष्ठ सदनात नियुक्ती केली आहे.



