- सिहांच्या संख्येत दिवसेंसिवस घट होत चालली आहे आणि हे मानवासाठी आणि परिसंस्थेसाठी फार धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे सिहांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षी 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिन साजरा करण्यात येतो.
जागतिक सिंह दिनाचा इतिहास
- ‘जागतिक सिंह दिन’ पहिल्यांदा 2013 मध्ये बिग कॅट रेस्क्यू द्वारे सुरू करण्यात आला. हे सिंहांसाठीचे जगातील सर्वात मोठे अभयारण्य आहे.
- याची सह स्थापना डेरेक आणि बेव्हरली जौबर्ट या दांपत्याने केली होती.
- जंगलात राहणाऱ्या सिंहांच्या संरक्षणासाठी ‘नॅशनल जिओग्राफिक’ आणि ‘बिग कॅट इनिशिएटिव्ह’ या दोन्ही संस्थांना एकाच बॅनरखाली आणण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आणि तेव्हापासून दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी ‘जागतिक सिंह दिन’ साजरा केला जाऊ लागला.
जागतिक सिंह दिनाचे महत्व
- जागतिक सिंह दिन हे सिंह आणि त्यांच्या संवर्धनाच्या गरजा यावर प्रकाश टाकून जंगलातील या उल्लेखनीय प्राण्यांचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी समर्थन आणि कृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
- त्यांच्या संवर्धनाची नितांत गरज आहे. त्यामुळे या दिवसाचा उद्देश लोकांना परिसंस्थांमध्ये सिंहांचे महत्त्व आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व पटवून देणे हा आहे.
उदार शक्ती सराव – 2024
- मलेशियात उदार शक्ती 2024 या सरावात यशस्वी सहभाग नोंदवून भारतीय हवाई दलाची तुकडी 10 ऑगस्ट 2024 रोजी भारतात परतली.
- रॉयल मलेशियन हवाई दलाबरोबरचा हा संयुक्त हवाई सराव 5 ते 9ऑगस्ट 2024 या कालावधीत मलेशियातील कुआंतान इथे पार पडला.
- या संयुक्त सराव सत्रात भारतीय हवाई दलाने Su-30MKI लढाऊ विमानांसह भाग घेतला.
- Su-30 या लढाऊ विमानांच्या परिचालनातील कार्यक्षम वाढवण्याच्या उद्देशाने दोन्ही हवाई दलातील तंत्रज्ञान विषयक तज्ञांनी एकमेकांच्या देखभाल कार्यपद्धती जाणून घेतल्या.
- पहिला उदार शक्ती सराव 2018 मध्ये आयोजित करण्यात आला होता.
अमन सेहरावतला कांस्य पदक
- भारताचा पुरुष कुस्तीपटू अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्य पदकावर नाव कोरले.
- त्याने 57 किलो वजनीगटात पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझ याच्यावर 13-5 असा दणदणीत विजय मिळवला आणि भारताला 2024 च्या ऑलिंपिकमधील सहावे पदक मिळवून दिले.
अमनची कामगिरी
- कांस्य पदक– 2024 पॅरिस ऑलिम्पिक (57 किलो)
- सुवर्णपदक– 2023 अस्ताना आशियाई अजिंक्यपद स्पर्धा (57 किलो)
- कांस्य पदक– 2022 हाँग्वझू आशियाई क्रीडा स्पर्धा (57 किलो)
- ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात कुस्ती या खेळात भारताच्या 7 खेळाडूंनी एकूण 8 पदके पटकावली.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे भारतीय कुस्तीवीर
1) खाशाबा जाधव – कांस्य (1952)
2) सुशील कुमार – कांस्य(2008), रौप्य (2012)
3) योगेश्वर दत्त – कांस्य (2012)
4) साक्षी मलिक – कांस्य(2016)
5) रविकुमार दाहिया – रौप्य(2020)
6) बजरंग पुनिया – कांस्य (2020)
7) अमन सेहरावत – कांस्य (2024)