- जगभरातील अनेक क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) प्रयोग केले जात आहेत. शिक्षणाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही.
- पारंपरिक मेखेला चादोर आणि दागिन्यांनी नटलेल्या ‘आयरिस’ या आसामच्या पहिल्या एआय शिक्षिकेने ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे.
- गुवाहाटीतील एका खासगी शाळेत आयरिस विद्यार्थ्यांची जिज्ञासा पूर्ण करत आहे.
- हिमोग्लोबिन म्हणजे काय, हा वर्गातील विद्यार्थ्यांनी विचालेला प्रश्न आयरिसने शांतपणे ऐकला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सविस्तर उत्तर दिले. विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्न अभ्यासक्रमातील असो किंवा अभ्यासक्रमाबाहेरील आयरिस कोणताही वेळ न दडवता संदर्भ आणि उदाहरणसह तात्काळ उत्तर देते.
- नीती आयोगाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या अटल टिंकरिंग लॅब (एटीएल) या प्रकल्पातून मेकरलॅब -एज्यु-टेकच्या सहकार्यातून आयरिस हा यंत्रमानव विकसित करण्यात आला आहे.
- शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या – एकीकरणामध्ये ‘आयरिस’ महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवितो.