Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘एनआरएआय’च्या अध्यक्षपदी कलिकेश सिंह यांची निवड

'एनआरएआय'च्या अध्यक्षपदी कलिकेश सिंह यांची निवड

एअरमार्शल अमर प्रीत सिंग नवीन हवाई दलप्रमुख

  • एअरमार्शल अमर प्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाचे नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
  • ते28 वे हवाईदल प्रमुख असतील.
  • एअरमार्शल सिंग यांनी पाच हजारांपेक्षा जास्त काळ उड्डाणांचा अनुभव आहे. सिंग सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
  • विद्यमानहवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
  • 27 ऑक्टोबर1964 रोजी जन्मलेले एअर मार्शल सिंग यांना  डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या ‘फायटर पायलट  स्ट्रीम’मध्ये नियुक्त करण्यात आले होते.
  • सुमारे40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत  त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
  • त्यांच्याकडेविविध ई प्रकारच्या विमानांच्या पाच हजारहून अधिक तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. तसेच ‘ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि ‘फ्रंटलाइन एअर – बेस’चे त्यांनी नेतृत्व केले आहे.
  • ‘टेस्ट पायलट’ म्हणून त्यांनी मॉस्कोमध्ये ‘मिग-29’ गटाचे नेतृत्व केले होते.
  • सिंगहे राष्ट्रीय उड्डाण चाचणी केंद्रात प्रकल्प संचालकही होते.
  • त्यांना’तेजस’ या हलक्या लढाऊ – विमानाच्या उड्डाण चाचणीचे काम  देण्यात आले होते.
  • एअरऑफिसर हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी , खडकवासला आणि वायुसेना अकादमी , दुंडीगलचे माजी विद्यार्थी आहेत.
  • तेडिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज , वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज , नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत
  • एअरमार्शल सिंग हे स्क्वॅश खेळाडू  आहेत.
  • त्यांना2019  मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि 2023 मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

भारतीय हवाई दल

  • स्थापना: 8 ऑक्टोबर 1932
  • मुख्यालय: नवी दिल्ली
  • ब्रीदवाक्य: नभःस्पृशं दीप्तम्
  • 8 ऑक्टोबर: हवाई दल दिन

एनआरएआयच्या अध्यक्षपदी कलिकेश सिंह यांची निवड

  • भारतीयराष्ट्रीय रायफल (एनआरएआय) संघटनेच्या अध्यक्षपदी कलिकेश नारायण सिंह यांची निवड करण्यात आली आहे.
  • संघटनेच्याझालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी व्ही. के. धवल यांचा 36 – 21 अशा मतांच्या फरकाने पराभव केला.
  • रनिंदरसिंग यांनी 2023 मध्ये राजीनामा दिल्यानंतर भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्षपद रिक्त होते.
  • याकालावधीत ओडिशाचे माजी खासदार कलिकेश सिंहच संघटनेचे दैनंदिन कामकाज बघत होते.
  • क्रीडामंत्रालयाच्या आचारसंहितेनुसार राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या अध्यक्षपदी एका व्यक्तीस 12 वर्षांपेक्षा अधिक काळ राहता येत नाही.
  • रनिंदर सिंग यांचा 12 वर्षांचा कालावधी डिसेंबर 2022 मध्येच संपुष्टात आला होता.
  • मात्र, मंत्रालयाने कालावधी संपल्याचे निदर्शनास आणल्यावर रनिंदर मार्चमध्ये पायउतार झाले होते.
  • या रिक्त जागेसाठी हे मतदान घेण्यात आले. कलिकेश आता 2025 पर्यंत अध्यक्ष राहतील.

NRAI : नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया

  • नॅशनलरायफल असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना 17 एप्रिल 1951 रोजी भारतात नेमबाजी खेळांना प्रोत्साहन आणि लोकप्रिय करण्यासाठी तसेच स्व-संरक्षण शिकवण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
  • NRAI राष्ट्रीयस्तरावरील नेमबाजी स्पर्धा आणि चाचण्यांचे आयोजन करते जे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणते खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतील हे ठरवतात.
  • लोकसभेचेपहिले सभापती श्री. जी.व्ही. मावळणकर यांनी NRAI ची स्थापना केली आणि तिचे उद्घाटक म्हणून काम केले.
  • मुख्यालय: नवीदिल्ली

आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

  • आमआदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या 8 व्या व 3 ऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • राष्ट्रीयराजधानीचे मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या तीन महिला मुख्यमंत्र्यांमध्ये त्या सर्वांत तरुण महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
  • याआधी सुषमा स्वराज आणि शिला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते.
  • दिल्लीचेनायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी आतिशी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना शपथ दिली.
  • आतिशीयांचा कार्यकाळ छोटा म्हणजे जेमतेम पाच महिन्यांचाच असेल.
  • पुढीलवर्षी फेब्रुवारीमध्ये राजधानीत विधानसभा निवडणुका होणार आहेत.

शैक्षणिक पार्श्वभूमी

  • आमआदमी पक्षाच्या 43 वर्षीय नेत्या आतिशी मार्लेना  पंजाबी राजपूत कुटुंबातून आहेत.
  • त्यांचाजन्म 8 जून 1981 रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील नामविजय सिंह हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
  • आतिशीयांचे शालेय शिक्षण स्प्रिंगडेल स्कूल नवी दिल्ली येथे झाले.
  • त्यांनीसेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून चेव्हनिंग स्कॉलरशिपवर पदव्युत्तर पदवी मिळवली.
  • त्यांनीऑक्सफर्डमधून शैक्षणिक संशोधनात रोड्स स्कॉलर म्हणून दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली.
  • त्यांनीमध्य प्रदेशातील एका गावात सात वर्षे सेंद्रिय शेती आणि प्रगतीशील शिक्षण प्रणालींमध्ये अभ्यास केला.
  • तिथेअनेक संस्थांसोबत त्यांनी काम केले आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. तिथेच त्या प्रथम काही आप पक्षाच्या सदस्यांना भेटल्या होत्या.

राजकीय प्रवास

  • 2020 मध्येआतिशी  पहिल्यांदाच कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या.
  • त्यांनीभाजपचे उमेदवार धरमवीर सिंह यांचा 11 हजार 393 मतांनी पराभव केला.
  • 2023 मध्येपहिल्यांदा त्यांना केजरीवाल सरकारमध्ये मंत्री पदाची संधी मिळाली.
  • अवघ्याएका वर्षानंतर 2024 मध्ये त्या मुख्यमंत्री झाल्या आहेत.
  • यापूर्वीत्यांनी 2019 मध्ये पूर्व लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली होती.
  • भाजपचेउमेदवार गौतम गंभीर यांच्याकडून77 लाख मतांनी त्या पराभूत झाल्या होत्या.
  • आतिशीया केजरीवाल यांच्या जवळच्या सहकारी आणि विश्वासू मानल्या जातात.
  • अण्णाहजारे यांच्या आंदोलनाच्या काळापासून त्या संघटनेत सक्रिय आहेत.
  • सध्यात्यांच्याकडे बहुतांश मंत्रालयांची जबाबदारी आहे.
  • आतिशीयांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्री तसेच मनीष सिसोदियाच्या शिक्षण खात्याच्या त्या सल्लागार म्हणून काम केले आहे.
  • त्यांनीमुख्यतः वैकल्पिक शिक्षण आणि अभ्यासक्रमाच्या क्षेत्रात काम केले आहे.

प्रतापगड संरक्षित स्मारक घोषित

  • साताऱ्यातील प्रतापगड हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून राज्य शासनाने घोषित केले आहे.
  • लवकरचयुनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ 2024 यादीत प्रतापगडचे नामांकन करण्यासाठी त्यांचे पथक गडावर येणार आहे.
  • त्याअनुषंगाने प्राचीन व ऐतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याने शासनाच्या अधिसूचनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • गड-किल्ल्यांचासमावेश युनेस्कोच्या नामांकनामध्ये होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *