‘एमपॉक्स‘ जागतिक आणीबाणी म्हणून घोषित
- आफ्रिकेच्या कांगोसह अन्य देशांमध्ये पसरलेली ‘एमपॉक्स’ आजाराची साथ ही जागतिक आणीबाणी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले.
- आफ्रिकेतील डझनभर देशांमधील लहान मुले आणि प्रौढांमध्ये या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून आतापर्यंत 500 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा या देशांमध्येही त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. Mpox संसर्गजन्य असून क्वचित प्रकरणांमध्ये तो प्राणघातक ठरु शकतो.
- याची लक्षणं फ्लूसारखी असतात आणि शरीरावर व्रण होतात.
- WHO नं आकस्मिक निधी म्हणून 15लाख अमेरिकन डॉलर्स दिले आहेत.
- हा विषाणू 1958 मध्ये माकडांमध्ये आढळला होता.
एमपॉक्सची लक्षणं
- एमपॉक्स विषाणूमुळं व्यक्तीला त्वचेवर लाल पुरळ येतात, जे 2-4 आठवडे राहू शकतात.
- या रुग्णाला ताप, घसा खवखवणं, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, अत्यंत थकवा येणं आणि सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजेच शरीरावर गुठळ्या होऊ शकतात.
- एमपॉक्स असलेले बहुतेक लोक पूर्णपणे बरे होतात, परंतु काही गंभीर आजारी होऊ शकतात.
‘अग्नि‘ मिसाइलचे जनक डॉ. अग्रवाल यांचे निधन
- ‘अग्नि’ मिसाइलचे जनक प्रख्यात आणि संशोधक डॉ. राम नारायण अग्रवाल यांचे वयाच्या 84 व्या वर्षी हैदराबाद येथे निधन झाले.
- ‘अग्नि’ मिसाइलचे ते पहिले संचालक होते. त्यामुळे ते अग्नि अग्रवाल आणि अग्नि मॅन म्हणूनही ओळखले जात.
- डॉ. अग्रवाल यांनी 1983 मध्ये ‘अग्नि’ मिसाइल प्रोग्रामची सुरुवात केली.
- त्यांच्या नेतृत्वात ‘अग्नि’चे विविध मिसाइल विकसित करण्यात आले.
- त्यांना संशोधन क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल 1990मध्ये पद्मश्री, तर 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- राम अग्रवाल यांचा जन्म 1939 मध्ये झाला होता.
- त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर केलं आणि त्यानंतर ते डीआरडीओमध्ये रुजू झाले.
- क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात त्यांनी भारतासाठीच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं नेतृत्व मागील कित्येक वर्षात केलं आहे.
त्सुंग दाओ ली यांचे निधन
- चीनचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते त्सुंग दाओ ली यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले.
- ‘नोबेल पारितोषिकाचे पहिले चिनी मानकरी’ ठरण्याचा मान ज्या दोघांना (1957 मध्ये, विभागून) मिळाला, त्या भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक त्सुंग दाओ ली आणि दुसरे चेंग निंग यांग.
- हे दोघेही चीनमध्ये जन्मलेले, पण अमेरिकेत निरनिराळ्या ठिकाणी संशोधन करत होते.
- एकाच देशाचे नसते, तरी एकाच क्षेत्रातले म्हणून हे दोघे एकत्र आले असते ! या दोघांनी आण्विक बलांचा अभ्यास केला आणि ‘धनभारित व ऋणभारित आण्विक बलाच्या सूक्ष्मकणांत भारांची तुल्यता (पॅरिटी) असते’ हा तोवरचा सिद्धान्तवजा समज त्यांनी 1956 मध्ये खोडून काढला.
- परित सूक्ष्मकणांच्या हालचाली बहुतेकदा आरशातल्या प्रतिमेप्रमाणे होतात आणि तुल्यता कायम राहते, असा तोवरचा समज होता.
- त्यावर विसंबता येणार नाही आणि सूक्ष्मकणाची हालचाल शिस्तीनेच होते असे मानण्यात अर्थ नाही, हे त्सुंग दाओ ली यांच्यामुळे मान्य झाले.
- या दोघांना ‘नोबेल’ मिळाल्यानंतर पुढल्या संशोधनाची नवी दिशा खुली होऊन, सुमारे सात वर्षांनी पीटर हिग्ज यांनी ‘बोसॉन’चे सैद्धान्तिक विवेचन केले.
- 1961 पर्यंत ली आणि यांग या जोडीने एकत्रित प्रयोग केले होते.
- पुढे आपला मार्ग वेगळा असल्याचे ठरवून ली यांनी काम सुरू ठेवले.
- ‘ली प्रतिरूप’ म्हणून सूक्ष्मकण हालचालींचे एक प्रतिरूप आज त्यांच्या नावाने ओळखले जाते तसेच ‘केएलएन थिअरम’ म्हणून ओळखले जाणारे प्रमेय मांडण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता.
- त्सुंग दाओ ली शांघायमध्ये 1926 या वर्षी जन्मले आणि तिथेच वाढले.
- हे तेव्हाचे अठरापगड शहर, इंग्रजाळलेले बंदर. तिथल्या चिनी ख्रिश्चन व्यापारी कुटुंबातील ली.
- चीनमधल्या माओ राजवटीच्या सुरुवातीच्या काळातच ते अमेरिकेत आले, कोलंबिया विद्यापीठात त्यांनी प्रवेश मिळवला आणि पुढे पुंजभौतिकीत बौद्धिक चमक दाखवली.
- 1962 मध्ये अमेरिकी नागरिकत्व स्वीकारले.
- 1972 नंतर मात्र अनेकदा ते चीनच्या निमंत्रणावरून तेथे गेले.
- चिनी शास्त्रज्ञांच्या संघटनेने त्यांना ‘परदेशी’ म्हणून सदस्यत्व दिले होते.