Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

कर्नल मनप्रीत सिंह यांच्यासह चौघांना कीर्तिचक्र

कर्नल मनप्रीत सिंह यांच्यासह चौघांना कीर्तिचक्र
  • 2023 या वर्षी सप्टेंबरमध्ये जम्मू- काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादविरोधी कारवाईत शहीद झालेले लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंह यांना मरणोत्तर कीर्ती चक्रपदक जाहीर झाले आहे.
  • मेजर मल्ला रामा गोपाल नायडू आणि रायफलमॅन रवी कुमार (मरणोत्तर) यांनाही शांतता काळातील दुसऱ्या क्रमांकाच्या लष्करी पदकाने गौरविले जाईल.
  • जम्मू-काश्मीरचे साहाय्यक पोलीस अधीक्षक हुमायूँ भट यांनाही कीर्तिचक्र जाहीर झाले आहे.
  • स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 103 शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली.
  • चार किर्तीचक्रारांसह 18 जणांना शौर्यचक्र(चौघांना मरणोत्तर), एक ‘बार टू सेना’ पदक , 63 जणांना सेना पदक , 11 जणांना नौसेना पदक आणि सहा वायू सेना पदकांचा यात समावेश आहे.
  • मुळचे चंदीगडजवळील भारोनजियान या पंजाबी गावाचे रहिवासी असलेले कर्नल मनप्रीत सिंह हे ‘राष्ट्रीय रायफल्स’मध्ये अधिकारी होते.
  • गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अनंतनागच्या कोकरनाग भागात अतिरेकी चकमकीत कर्नल सिंह यांना वीरमरण आले होते.

सीआरपीएफला सर्वाधिक पुरस्कार

  • स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने सर्वाधिक 52 पदके पटकाविली आहेत.
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार 25 पदके जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईसाठी तर 27 पदके ही देशाच्या विविध भागांत नक्षलविरोधी कारवायांमध्ये शौर्य गाजविणाऱ्या जवानांना देण्यात येत आहेत.

राजेंद्र डहाळे, सतीश गोवेकर यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक

  • स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल राज्य गुप्त वार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे, तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले.
  • पुणे ग्रामीण पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले, तसेच ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर करण्यात आले.
  • राज्य कारागृह विभागातील 5 अधिकारी राष्ट्रपतिपदकाचे मानकरी ठरले आहेत.
  • नंदुरबार येथे 2017मध्ये डहाळे  पोलीस अधीक्षक होते. त्या वेळीही त्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले  होते.
  • डॉ. डहाळे दुसऱ्यांदा राष्ट्रपतिपदकाचे मानकरी ठरले आहेत.
  • डहाळे पुणे पोलिसांच्या  सायबर गुन्हे शाखेत उपायुक्त होते.
  • डहाळे यांच्या कार्यकाळात सायबर – फॉरेन्सिक लॅबची स्थापना करण्यात आली होती.
  • अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी पुण्यात काम केले होते.
  • राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) ते नियुक्तीस होते. शांत, मितभाषी असलेल्या डहाळे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले होते.

सतीश गोवेकर :

  • 1988 मध्ये दलात रुजू झाले.
  • पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी पुण्यात काम केले.
  • अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा गोवेकर यांनी लावला.
  • 2007 मध्ये त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली.
  • 2017 मध्ये ते सहायक पोलिस आयुक्त झाले.
  • फरासखाना विभागात ते सहायक आयुक्त होते. त्यानंतर त्यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली.
  • मुंबई शहर, नवी मुंबई, नागपूर ग्रामीण, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे शहरात त्यांनी सेवा बजावली.

आशा पारेख यांना राज कपूर जीवनगौरव

  • राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023 साठीचा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला.
  • स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलन एन. चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार ,लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिगपाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली .
  • स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये मानपत्र व मानचिन्ह असे असून स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप सहा लाख रुपये मानपत्र व मानचिन्ह असे आहे.

ईडीच्या प्रमुखपदी राहुल नवीन

  • सक्तवसुली संचलनालयाचे संचालक म्हणून केंद्र सरकारने भारतीय महसूल सेवेचे अधिकारी राहुल नवीन यांची नियुक्ती केली आहे.
  • नवीन हे 1993 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीच्या झालेल्या बैठकीत नवीन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी नवीन हे याच संस्थेत विशेष संचालक म्हणून कार्यरत होते.
  • प्रभारी संचालक म्हणून मागील 11 महिन्यांपासून ते कार्यरत होते.

डोडा गणेश केनियाचे प्रशिक्षक

  • भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू डोडा गणेश याची केनियन क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
  • 2026 मधील टी-20 विश्वकरंडकासाठी आफ्रिका खंडातील देशांमध्ये पात्रता फेरी रंगणार आहे.
  • त्याआधी गणेशची महत्त्वाच्या पदासाठी निवड करण्यात आली आहे.
  • डोडा गणेश भारतीय संघासाठी चार कसोटी सामने व एक एकदिवसीय सामना खेळला.
  • गणेश याला अधिक काळ देशासाठी खेळता आले नसले तरी कर्नाटक संघासाठी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *