आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ अर्थात ‘फिडे’च्या वतीने देण्यात येणारा वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षकांचा पुरस्कार भारताच्या अभिजित कुंटे आणि आरबी रमेश यांना जाहीर झाला आहे. त्यांना 2023 या वर्षासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
अधिक माहिती
● प्रशिक्षक म्हणून खुल्या विभागातील सर्वोत्तम कामगिरीमुळे रमेश हे मिखाईल बोट्विनिक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
● त्यांच्या मार्गदर्शनाखालील आर. प्रज्ञानंद, 2022 च्या दुबई खुल्या स्पर्धेचा विजेता अरविंद चिदम्बरम, आर. वैशाली आणि सविता श्री आदी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
● तसेच 2022 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली भारत-ब संघाने कांस्यपदक मिळवले होते.
● दुसरीकडे, कुंटे यांना महिला संघाना प्रज्ञानंद, प्रशिक्षण देताना केलेल्या यशस्वी कामगिरीसाठी वखतांग कार्सेलाड्झे पुरस्कार जाहीर झाला आहे.
● कुंटे यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय महिला संघाने जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद (2021) आणि आशियाई क्रीडा स्पर्धा (2022) यात रौप्य , तर ऑलम्पियाडमध्ये कांस्यपदक पटकावले होते.