टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानातील तज्ञ आणि आयआयटी-कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांची सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली. देशात 5 – जी तंत्रज्ञान सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या तंत्रज्ञानांपैकी करंदीकर एक आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी दुसऱ्यांदा मराठी शास्त्रज्ञाची निवड झाली आहे. याआधी 1986 ते 1991 या काळात डॉक्टर वसंत गोवारीकर हे सचिव होते. करंदीकर यांची 2018 मध्ये आयआयटी कानपूरचे संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. तंत्रशास्त्रज्ञ असलेल्या करंदीकरांचे नाव विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आदराने घेतले जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन सचिव सी. चंद्रशेखर यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्यानंतर गेले दोन महिने हे पद रिक्त होते. या कालावधी दरम्यान या विभागाचा अतिरिक्त कार्यभार जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश गोखले यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
करंदीकर यांचा अल्पपरीच:-
जन्म:- 15 जून 1965 , ग्वाल्हेर(मध्य प्रदेश)
आयआयटी-कानपूरमधून विद्युत अभियांत्रिकीची पदवी .
आयआयटी कानपूर मधूनच पीएचडी पूर्ण
‘वायर्ड आणि वायरलेस नेटवर्क’ तंत्रज्ञानातील संशोधनासाठी प्रसिद्ध
देशात 5 – जी तंत्रज्ञान सुरू करण्यामागे असलेल्या मोजक्या तज्ञांपैकी एक
ग्रामीण भारताला 5- जी शी जोडण्यास मदत करू शकेल, असा तांत्रिक ढाचा विकसित करण्यावर भर.


