Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

केरळमध्ये अमिबाचा चौथा रुग्ण आढळला

  • केरळमध्ये मेंदू कुरतडणारा अमिबा संसर्गाने बाधित आणखी एक रुग्ण आढळून आला आहे.
  • हा रुग्ण उत्तर केरळच्या पय्योली जिल्ह्यातील असून पीडित मुलाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • या आजाराला अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस असे म्हटले जाते.
  • या आजारामुळे आतापर्यंत तीन मुले मृत्युमुखी पडले आहेत.
  • या आजाराने ग्रस्त असलेला मे महिन्यानंतरचा हा पहिला आणि एकूण चौथा रुग्ण आहे.
  • या आजाराने आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

मेंदू खाणारा अमिबा म्हणून प्रसिद्ध

  • यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, पीएएम हा मेंदूचा संसर्ग आहे जो अमीबा किंवा नेग्लेरिया फॉवलेरी नावाच्या एकल-पेशी जीवांमुळे होतो.
  • हा अमीबा तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे यांसारख्या माती आणि उबदार गोड्या पाण्यात राहतो.
  • याला सामान्यतः ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असे म्हणतात कारण जेव्हा अमिबा असलेले पाणी नाकात जाते तेव्हा ते मेंदूला संक्रमित करते.
  • ‘प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ म्हणजेच पीएएम या आजारात मेंदू खाणारा अमिबा मानवी मेंदूला संक्रमित करतो आणि मांस खातो.
  • हा सामान्य अमिबा नाही, ज्याचा संसर्ग प्रतिजैविकांनी बरा होऊ शकतो. हे इतके जीवघेणे आहे की जर संसर्ग वेळीच थांबला नाही तर 5 ते 10 दिवसात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
  • लक्षणे: डोकेदुखी, ताप, उलट्या होणे, झटके येणे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *