Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

कोरोनाच्या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. गंगाखेडकर

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येवर उपाययोजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदल अर्थात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाच्या नवीन जेएन. 1 या व्हेरिएंटच्या प्रकारातील रुग्णवाढीची संख्या लक्षात घेत टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली.

अधिक माहिती
● नवीन टास्क फोर्सच्या अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
● या टास्क फोर्समध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, बी.जे. मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील (फिजिशियन) डॉ.डी. बी. कदम हे सदस्य आहेत, तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *