कोहलीच्या 14 हजार धावा
- चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या शानदार खेळीदरम्यान भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय कारकीर्दीत 14 हजार धावांचा टप्पा ओलांडला.
- अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर (18426 धावा) आणि कुमार संगकारा (14234 धावा) यांच्यानंतर केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे.
- मात्र, हा टप्पा सर्वांत जलद गाठण्याचा विक्रम कोहलीच्या नावे झाला आहे. त्याने केवळ 287 व्या एकदिवसीय डावात 14 हजार धावा पूर्ण केल्या.
- या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी सचिनने 350 डाव, तर संगकाराने 378 डाव घेतले होते.
- याच बरोबरी कोहलीने एकदिवसीय क्रिकेट प्रकारात 51 शतकांना (सर्वाधिक) गवसणी देखील घातली.