● गगनयान मोहिमेतील अवकाशकुपीला जोडलेल्या पॅराशूट यंत्रणेची चाचणी (इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट- आयएडीटी ०१) यशस्वी झाल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केले.
● येत्या डिसेंबरमध्ये व्योममित्रा या रोबोसह मोहिमेचे पहिले मानवरहित प्रक्षेपण होणार आहे.
● ‘गगनयान’ मोहिमेमध्ये पॅराशूटवर आधारित मंदक यंत्रणा (डीसीलरेशन सिस्टीम) यामुळे प्रमाणित होण्यास मदत होणार आहे.
● आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाजवळ ‘इस्रो’, हवाई दल, डीआरडीओ, नौदल आणि तटरक्षक दल यांनी संयुक्तपणे ही चाचणी घेतली.
● गगनयान भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असून यात भारतीय अंतराळवीराला स्वदेशी बनावटीच्या यानातून अवकाशात पाठवून परत आणण्यात येणार आहे.
● अंतराळवीरांना सुखरूप जमिनीवर आणण्यासाठी ‘एअर ड्रॉप’ प्रणालीमध्ये कौशल्य मिळविणे आवश्यक आहे.
तीन मानवरहित चाचण्या होणार
● गगनयान मोहिमेच्या 2025- 26 या वर्षात तीन मानवरहित चाचण्या नियोजित असून, या ह्युमन चाचण्यांमधून रेटेड लाँच व्हेइकल मार्क ३ (एचएलव्हीएम ३) रॉकेट आणि अवकाशकुपीच्या विविध यंत्रणांचे कार्य तपासण्यात येईल.
● सन 2027 च्या सुरुवातीला दोन भारतीय अंतराळवीरांची पहिली भारतीय मानवी अवकाश मोहीम पार पडेल.