● जगज्जेत्या दोमाराजू गुकेशविरुद्ध खेळाची वेळेशी सांगड घालणे जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला जमले नाही. त्यामुळे त्याला नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील सहाव्या फेरीच्या साखळी लढतीत हार पत्करावी लागली.
● गुकेशचा हा कार्लसन विरुद्ध क्लासिकल प्रकारातील पहिलाच विजय आहे.
● जगजेता झाल्यावर कार्लसनला स्पर्धात्मक लढतीत पराभूत करणारा गुकेश हा दुसरा भारतीय आहे .
● यापूर्वी अशी कामगिरी रमेशबाबू प्रज्ञानंदने केली होती.