Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

गुरुत्वीय लहरींच्या पार्श्वभूमीच्या शोध | DISCOVERY OF THE BACKGROUND OF GRAVITATIONAL WAVES

  • Home
  • Current Affairs
  • गुरुत्वीय लहरींच्या पार्श्वभूमीच्या शोध | DISCOVERY OF THE BACKGROUND OF GRAVITATIONAL WAVES

जागतिक पातळीवर आतापर्यंत झालेल्या गुरुत्वीय लहरींच्या संशोधनाला दिशा देणारे नवे संशोधन समोर आले आहे. ब्रह्मांडातील अतिशय कमी वारंवारिता असलेल्या गुरुत्वीय लहरींच्या पार्श्वभूमीच्या शोध घेण्यात आला असून या संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग आहे . विश्वातील सर्वोत्तम घड्याळ मानल्या गेलेल्या पल्सार ताऱ्यांच्या तब्बल 25 वर्षांच्या नोंदीचे विश्लेषण करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष हाती आले. लायगो वेध शाळेने शोधलेल्या गुरुत्वीय लहरींच्या शोधापेक्षाही संशोधन वेगळे ठरले आहे . राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक केंद्र यासह आयनपीटीए, टाटा फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, आयआयटी रूरकी ,आयसर भोपळा ,आयआयटी हैदराबाद इन्स्टिट्यूट या भारतीय संस्थांचा संशोधनात सहभाग होता. या संशोधनासाठी पुण्याजवळील खोडद येथील अद्यावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीणसह जर्मनी, युरोप ,फ्रान्स ,इटली नेदरलँड येथील दुर्बिनांचा वापर करण्यात आला. या संशोधनाचे 16 शोध निबंध प्रसिद्ध करण्यात आले सुमारे 100 वर्षांपूर्वी थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी गुरुत्व लहरींचे अस्तित्व सांगितले होते. त्याचा पुरावा 2015- 16 मध्ये लायगो वेधशाळेच्या संशोधनातून हाती आला होता त्यानंतर दीर्घिकांच्या केंद्रांमध्ये महाकाय कृष्णविवरे असतात या संशोधनाला 2020 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर आता गुरुत्वीय लहरींच्या पार्श्वभूमीचा पुरावा पहिल्यांदाच हाती आला.

नेमके संशोधन काय ?

  • आजवर शोधलेल्या गुरुत्वीय लहरी या सूर्याच्या दहा ते बारा पट जास्त वस्तुमान असलेल्या अवकाशीय घटकांपासून तयार झालेल्या होत्या.
  • पण शास्त्रज्ञानी आता शोधलेल्या या लहरी सूर्याच्या हजारो पट वस्तुमान असलेल्या अवकाशीय घटकांपासून तयार झाल्या आहेत.
  • म्हणजे त्यांची वारंवारिता 2015 मध्ये शोधलेल्या गुरुत्वीय लहरींच्या वारंवारतेपेक्षा 10 अब्जपटींनी कमी आहे.
  • न्यूट्रॉन ताऱ्याच्या स्पंदकांचा वापर करत शास्त्रज्ञानी केवळ एकाच नाही तर अशा अनेक गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केले आहे. ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्ह बॅकग्राऊंड असे म्हणू शकतो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *