- मोबाईल कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जागतिक कंपनी कॉर्निंग कार्पोरेशनने ऑप्टिमस इन्फ्राकॉम या दूरसंचार व उत्पादन कंपनीशी भागीदारी करून तमिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातील सिपकॉट पिल्लईपक्कम औद्योगिक वसाहतीमध्ये भारत इनोव्हेटिव्ह ग्लास टेक्नॉलॉजीज या उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी केली आहे.
- हा प्रकल्प उच्च गुणवत्तेच्या कव्हर ग्लास पार्टचे उत्पादन करणारा देशातील पहिला प्रकल्प आहे. येथे तयार करण्यात आलेल्या उपकरणांची निर्यातही केली जाणार आहे.
- हा प्रकल्प भारतीय व जागतिक बाजारपेठेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या प्रकल्पामुळे तमिळनाडूमधील मजबूत पायाभूत व सुविधा, कुशल कामगार आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरण अधोरेखित झाले आहे.
- या नव्या प्रकल्पामुळे राज्यात रोजगाराच्या शेकडो संधी निर्माण होण्यासह जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवण्याच्या उद्दिष्टातही लक्षणीय योगदान मिळेल.