Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

चित्रपट निर्माते प्रीतिश नंदी यांचे निधन

चित्रपट निर्माते प्रीतिश नंदी यांचे निधन

प्रवासी भारतीय दिन

  • अनिवासीभारतीयांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेले अतुलनीय कार्य आणि दिलेले  योगदान लक्षात  ठेवण्यासाठी  9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो.

महत्व:

  • हादिवस साजरा करण्यासाठी 9 जानेवारी हा दिवस निवडण्यात आला कारण याच दिवशी 1915 मध्ये महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले आणि भारतीयांचे जीवन कायमचे बदलले.
  • प्रवासीभारतीय दिवस  दोन वर्षातून एकदा 9 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो भारतीय डायस्पोराच्या त्यांच्या जन्मभूमीसाठी योगदानाचा सन्मान करतो.
  • प्रवासीभारतीय दिवस (PBD) अधिवेशनाची स्थापना प्रथम 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या अंतर्गत , परदेशी भारतीय समुदायाला ओळखण्यासाठी आणि त्यांच्याशी संलग्न होण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून करण्यात आली होती.
  • 18 वेप्रवासी भारतीय  अधिवेशन 8-10 जानेवारी 2025 रोजी भुवनेश्वर, ओडिशा येथे होत आहे.
  • यावर्षाची थीम आहे “विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान
  • यातत्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकच्या अध्यक्षा क्रिस्टीन कार्ला कांगालू या प्रमुख पाहुणे असतील आणि  पाहुण्यांचे आभासी भाषणही असेल.
  • 8 ते10 जानेवारी 2023 दरम्यान इंदूर , मध्य प्रदेश येथे आयोजित 17 व्या PBD अधिवेशनात “डायस्पोरा: अमृत कालमध्ये भारताच्या प्रगतीसाठी विश्वसनीय भागीदार” या थीमवर लक्ष केंद्रित केले गेले.

चित्रपट निर्माते प्रीतिश नंदी यांचे निधन

  • पत्रकारितेकडूनलेखनाकडे आणि नंतर चित्रपट निर्मिती क्षेत्राकडे वळालेले प्रीतिश नंदी यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले.
  • प्रीतिशनंदी 1990 च्या दशकात दूरदर्शनवर ‘प्रीतिश नंदी शो’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असत. त्या कार्यक्रमात त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेतल्य.
  • 2000 च्यादशकाच्या सुरुवातीस ‘प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्स’ च्या बॅनरखाली त्यांनी सूर, कांटे, झंकार बीट्स, चमेली, हजारों ख्वाईशे ऐंसी, प्यार के साइड इफेक्ट्स यासारख्या चित्रपटांसह अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती.
  • याकंपनीने अलीकडेच ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ आणि ‘मॉडर्न लव्ह मुंबई’ या वेबसिरीजची निर्मिती केली.
  • नंदीहे शिवसेनेचे राज्यसभा सदस्य होते.
  • याखेरीजप्राणिहक्कांसाठी ते जागरूक होते.
  • त्यांनीइंग्रजीत 40 पुस्तके लिहिली. तसेच बंगाली, उर्दू आणि पंजाबी कवितांचे इंग्रजीत भाषांतर केले.

उमेश झिरपे यांना ‘तेनजिंग नॉर्गेपुरस्कार जाहीर

  • राष्ट्रपतीद्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गिर्यारोहक उमेश झिरपे यांना ‘तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार 2023’ने दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे 17 जानेवारी रोजी गौरविण्यात येणार आहे.
  • 15 लाखरुपये , सन्मानचिन्ह , सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
  • हापुरस्कार क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कारास समकक्ष असून, झिरपे यांच्या गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यात आली आहे.
  • ‘तेनजिंगनॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ हा केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारा साहस क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
  • साहसक्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कामगिरीसाठी तो दिला जातो.
  • झिरपेहे ‘गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंग’ आणि ‘गिरीप्रेमी अॅडव्हेंचर फाउंडेशन’ या संस्थांचे संस्थापक संचालक आहेत, तसेच झिरपे हे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष असून, यापूर्वी राज्याच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘श्री शिवछत्रपती साहसी क्रिडा पुरस्कारा’ ने त्यांना गौरविण्यात आले आहे.
  • जगातीलसर्वोच्च आठ अष्ठहजारी हिमशिखरांवरील यशस्वी मोहिमांचे नेतृत्व करणारे देशातील ते एकमेव गिर्यारोहक आहेत, तसेच 2023 मध्ये जगातील पहिल्या यशस्वी ‘मेरू मोहिमेचे’ यशस्वी नेतृत्व केले आहे.
  • त्याचबरोबरगिर्यारोहण विषयावर त्यांची अनेक पुस्तके व व्याख्याने प्रसिद्ध आहेत.

अधिकारीपदी पहिल्यांदाच महिलेची निवड

  • पोपफ्रान्सिस यांनी सिस्टर सिमोना ब्रामिला यांना व्हॅटिकनमधील सर्व चर्चना द्यायच्या धार्मिक आदेशांविषयीच्या कार्यालयाच्या प्रमुख म्हणून नेमले आहे.
  • यापदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *