Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जगातील सर्वांत उंच रेल्वेपुलाचे लोकार्पण World’s highest railway bridge inaugurated

  • Home
  • June 2025
  • जगातील सर्वांत उंच रेल्वेपुलाचे लोकार्पण World’s highest railway bridge inaugurated
World's highest railway bridge inaugurated

● काश्मीर खोऱ्याला रेल्वेमार्गाने जोडणाऱ्या, जगातील सर्वांत उंच चिनाब रेल्वेपुलाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
● या रेल्वेमार्गामुळे काश्मीर खोरे उर्वरित भारताशी बारमाही जोडले गेल्याने जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
● पंतप्रधान मोदी यांनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला या 272 किमी रेल्वे मार्गावरील चिनाब पुलावर 6 जून रोजी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
● या प्रकल्पामुळे काश्मीर खोऱ्याला थेट रेल्वेसेवेची जोडणी मिळाली आहे.
● पंतप्रधान मोदी यांनी कटरासह अन्य ठिकाणच्या एकूण 46,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले.
● ‘उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प नव्या आणि सक्षम जम्मू-काश्मीरचे प्रतीक आहे.
● भारताच्या वाढत्या ताकदीची त्यातून प्रचीती येते.
● चिनाब आणि अंजी पुलांमुळे जम्मू-काश्मीरच्या विकासाचे दालन खुले होईल,’ असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
● पुलाची लांबी : 1315 मी.
● चिनाब नदीपासून पुलाची उंची : 359 मी.
● पुलाचा खर्च: 1,486 कोटी रु.
● प्रकल्पासाठी खर्च : 43,780 कोटी रु.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *